बीड, दि.
4 :- अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनमधील बंदी मयत आरोपी शेख महमंद शेख रुस्तुम रा.कोरेगाव
ता.केज जि.बीड यांच्या मृत्यु संदर्भात दंडाधिकारीय चौकशी करण्यास आदेशित करण्यात आले
असून दि.20 जानेवारी 2017 रोजी सकाळी 11 वाजता उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, अंबाजोगाई
येथे दंडाधिकारीय चौकशी करण्यात येणार आहे. या घटनेसंदर्भात म्हणने मांडावयाचे असल्यास
किंवा माहिती सांगावयाची असल्यास उपस्थित राहून आपले म्हणने लेखी अथवा तोंडी स्वरुपात
सादर करावे. तसेच काही पुरावे असतील ते सादर करावेत. असे अंबाजोगाईचे उपविभागीय दंडाधिकारी
शिवकुमार स्वामी यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा