बीड, दि. 4 :- पुराभिलेख संचालनालयाकडून
मोडी लिपीचे प्रशिक्षण वर्गाचे दि.5 ते 14 जानेवारी 2017 या कालावधीत सायंकाळी 4 ते
6 या वेळेत बलभीम कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बीड येथे आयोजन करण्यात आले
आहे.
या प्रशिक्षण
वर्गात शासकीय कर्मचारी, इतिहासाचे अभ्यासक तसेच इतिहासप्रेमी नागरिक सहभागी होऊ शकतात.
प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची 100 गुणांची परीक्षा घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या
प्रशिक्षणार्थ्यांना पुराभिलेख संचालनालयातर्फे प्रमाणपत्र देण्यात येईल. इच्छुकांनी
बलभीम महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख डॉ.बी.डी. जाधव (मो.9421350873) यांच्याकडे
नाव नोंदणी करावी किंवा पुराभिलेख संचालनालय, महाराष्ट्र शासन, एलफिन्सटन महाविद्यालय
इमारत, मुंबई (दुरध्वनी-22843971/ 22844268) येथे संपर्क साधावा. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य
देण्यात येईल. मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचा सर्वांनी लाभ घ्यावा. असे पुराभिलेख संचालनालय
मुंबईचे संचालक डॉ.दिलीप बलसेकर यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा