बुधवार, ४ जानेवारी, २०१७

पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांचा बीड जिल्हा सुधारीत दौरा कार्यक्रम



बीड, दि. 4 :- राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा सुधारीत दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दि.6 जानेवारी 2017 रोजी सकाळी 9 वाजता वाहनाने ता.माजलगावकडे प्रयाण. सकाळी 9.30 वाजता बीड-परळी रस्त्यावर जवळा फाटा ता.धारुर येथे फकीर जवळा ते चिखली देवठाना रस्त्याचे भूमिपूजन. सकाळी 10 वाजता दिंद्रुड ता.माजलगाव येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व बसस्टँड चौक येथे जाहिर सभा. दुपारी 11.30 वाजता पात्रूड ता.माजलगाव येथे पात्रूड लोनगाव रस्त्याचे भूमिपूजन व सभा. दुपारी 12.30 वाजता वाहनाने वडवणी मार्गे ताडसोन्ना ता.बीडकडे प्रयाण. दुपारी 1.30 वाजता आगमन व 2515 निधी अंतर्गत सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन. दुपारी 2 वाजता ताडसोन्ना ते पिंपळनेर ता.बीड दरम्यान पुलाचे भूमिपूजन. दुपारी 2.30 वाजता मनोज पाटील जिप सदस्य यांचे निवासस्थानी राखीव. दुपारी 3 वाजता पिंपळनेर ता.बीड येथे सीआरएफ अंतर्गत पिंपळनेर पात्रूड रस्त्याचे भूमिपूजन. दुपारी 3.15 वाजता पिंपळनेर फाटा ते सांडरवन फाटा ता.बीड रस्त्याचे भूमिपूजन. दुपारी 3.30 वाजता पिंपळनेर ते घाटसावळी ता.बीड  हिवरापहाडी मार्गे रस्त्याचे भूमिपूजन. दुपारी 3.45 वाजता पिंपळनेर ते बेलवाडी ता.बीड सीएमजीएसवाय रस्ता भूमिपूजन. दुपारी 4 वाजता पिंपळनेर येथे जाहिर सभा. दुपारी 4.45 वाजता पिंपळनेर ते कुक्कडगाव ता.बीड रस्ता सुधारणा कामाचे भूमिपूजन. सायंकाळी 5 वाजता ईट गुंदा ते लोणी शहाजानपूर सीएमजीएसवाय रस्ता भूमिपूजन. सायंकाळी 5.15 वाजता वडगाव ते गुंजाळा रस्ता भूमिपूजन. सायंकाळी 5.30 वाजता गुंधावाडी फाटा ते गुंधावाडी रस्ता भूमिपूजन. सायंकाळी 5.45 वाजता कुक्कडगाव ते कुर्ला रस्ता कामाचे भूमिपूजन.  सायंकाळी 6.30 वाजता दर्पण दिनानिमित्त पत्रकार भवन, गेवराई येथे सदिच्छा भेट. सायंकाळी 6.45 वाजता राक्षसभूवन ता.गेवराई येथे सीआरएफ अंतर्गत रस्ता कामाचे भूमिपूजन. रात्री 7 वाजता वाहनाने उनापूर ता.गेवराई जि.बीड येथील जाहीर सभेस उपस्थिती. रात्री 8 वाजता वाहनाने औरंगाबादकडे प्रयाण करतील.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा