शुक्रवार, २ डिसेंबर, २०१६

स्वच्छ महाराष्ट्र मिशनची कामे मुदतीत पुर्ण करावीत - जिल्हाधिकारी नवल किशोर राम



बीड, दि. 2 :- जिल्हयातील सर्व नगर पालिका व नगर पंचायतींनी स्वच्छ महाराष्ट्र मिशन अंतर्गत करावयाच्या कामांचे युध्दपातळीवर योग्य नियोजन करुन ही कामे मुदतीत पूर्ण करावीत.  तसेच जिल्ह्यातील सर्व शहरे  मार्च 2017 पर्यंत हागणदारीमुक्त करावीत असे निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले.
स्वच्छ महाराष्ट्र मिशनच्या कामाचा आढावा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्ह्यातील सर्व नगर परिषद व नगर पंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा प्रशासन अधिकारी सतिश शिवणे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले की, शौचालयाचे उद्यीष्ट  निश्चीत करुन तात्काळ निधी लाभार्थ्यांच्या नावे वर्ग करावा. सर्व मुख्याधिकाऱ्यांनी स्वच्छ महाराष्ट्र मिशनच्या कामांबाबतचा नियोजन आराखडा तयार करुन त्यानुसार कामे करावीत आणि त्याबाबतचा प्रगती  अहवाल वेळेावेळी सादर करावा. त्याकरीता मुख्याधिकारी यांनी प्रभाग स्तरावर जनजागृतीसाठी प्रयत्न करावेत व शौचालय नसलेल्या लाभार्थ्यांची नोंदणी करुन तातडीने शौचालयाची कामे पुर्ण करावित. यासाठी 14 व्या वित्त आयोगाचा निधी उपलब्ध करुन दयावा असे निर्देश देण्यात आले. शासन स्तरावरुन आवश्यक आसल्यास जास्तीचा निधी उपलब्ध करुन दिला जाईल असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. या योजनेत उद्यीष्ट पुर्ती न केल्यास संबंधित मुख्याधिकाऱ्यांवर कार्यवाही प्रस्तावीत केली जाईल असेही जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी मालमत्ता व ईतर कराची वसुली ,निवडणूक विषयक कामे, राष्ट्रीय जनगणना, सन 2017-18 चा प्रस्तावीत आराखडा आदी कामांचाही आढावा  जिल्हाधिकारी राम  यांनी घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा