शुक्रवार, २ डिसेंबर, २०१६

7 डिसेंबर रोजी ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळावा


                  
          बीड, दि. 2 :- ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रमाचा शुभारंभ बुधवार दि.7 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. तसेच जिल्हाधिकारी राम यांच्या अध्यक्षतेखाली  जिल्ह्यातील माजी सैनिकांचा मेळावा याच दिवशी आयोजित केला असून जास्तीत जास्त माजी सैनिक, युध्द विधवा व माजी सैनिक विधवांनी उपस्थित रहावे. असे बीडचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन सुभाष ढोरजकर (नि.) यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा