बीड, दि. 7 :- महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालय, मुंबईच्या
अधिपत्याखालील जिल्हा उद्योग केंद्र,बीड या कार्यालयामार्फत सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग
घटकांकरीता सामुहिक प्रोत्साहन योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत उद्योग घटकांना
त्यांच्या स्थिर मालमत्तेच्या गुंतवणुकीच्या प्रमाणात विक्रीकर माफी, व्याज अनुदान,
विद्युत शुल्क माफी इत्यादी सवलती देण्यात येतात. या योजनेची अंमलबजावणी उद्योग विभागाचे
ऑनलाईन पध्दतीने करणे अनिवार्य केल आहे. तरी जिल्ह्यातील सर्व उद्योजकांनी सामुहिक
प्रोत्साहन योजना 2013 चे अर्ज di.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सादर करावेत
असे बीड जिल्हा उद्योग केंद्रोच महाव्यवस्थापक यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा