बीड, दि. 7 :- जिल्हा आस्थापनेवरील तलाठी संवर्गाची लेखी
परीक्षा रविवार दि.11 सप्टेंबर 2016 रोजी बीड जिल्हा केंद्रावर सकाळी 11 ते 1 या वेळेत
व वाहनचालक संवर्गाची लेखी परीक्षा दुपारी 3 ते 5 या वेळेत तर लघुटंकलेखक संवर्गाची
लेखी परीक्षा दुपारी 3 ते 4.30 या वेळेत एकुण (1) उपकेंद्रामधूनल घेण्यात येणार आहे.
तलाठी संवर्गाच्या परीक्षेसाठी एकुण 15 हजार 341 उमेदवार, वाहनचालक पदासाठी 304 उमेदवार
आणि लघुटंकलेखक परीक्षेसाठी 144 उमेदवार परीक्षेला बसले असून परीक्षेच्या कालावधीत
उपकेंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घेडू नये यासाठी परीक्षा उपकेंद्रावर पोलीस बंदोबस्त
ठेवण्यात आला आहे. तसेच परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रीया संहितेचे
1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. जिल्हा निवड समिती अध्यक्ष
तथा जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनूसार या परीक्षेसाठी बसलेल्या उमेदवारांनी त्यांच्याकडील
मोबाईल, पेजर, कॅल्कुलेटर व अभ्यासाचे इतर साहित्य परीक्षा केंद्रावर घेवून जाता येणार
नाही. तसेच लेखी परीक्षेसाठी आवश्यक साहित्यच उमेदवारांना जवळ बाळगण्याची मुभा राहील.
सर्व उमेदवारांनी परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत स्वत:चे
आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स (फक्त स्मार्टकार्ड
प्रकारचे) यापैकी कोणतेही एक ओळखपत्र व त्याची एक छायाकिंत प्रत सोबत आणणे आवश्यक आहे.
तलाठी संवर्गाच्या परीक्षेसाठी उमेदवारांना त्यांच्या परीक्षा केंद्रावर सकाळी 10 वाजेपूर्वी
व वाहनचालक, लघुटंकलेखक संवर्गाचे परीक्षेसाठी उमेदवारांनी त्यांच्या परीक्षा केंद्रावर
2 वाजेपुर्वी उपस्थित रहावे. परीक्षा सुरु झाल्यानंतर केंद्रावर येणाऱ्या उमेदवारांना
कोणत्याही सबबीखाली प्रवेश देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. सर्व परीक्षार्थीनी
कोणत्याही भूलथापा अथवा प्रलोभनाला बळी पडू नये तसेच परीक्षेदरम्यान उमेदवार गैरमार्गाने
कोणतीही कृती करतांना दिसून आल्यास संबंधिताविरुध्द फौजदारी कारवाई करण्यात येईल याची
नोंद घ्यावी. असे जिल्हाधिकारी, बीड यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा