बीड, दि. 7 :- विविध सण, उत्सव शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने
तसेच समाजातील वेगवेगळ्या जाती धर्मातील लोकांमध्ये ऐक्य वाढवून सलोखा राहून समाजात
शांतता कायम रहावी याकरीता बीड जिल्हा पोलीस दल, विविध सामाजिक संघटना, मान्यवर व्यक्ती
यांच्या संयुक्त विद्यमाने "रन फॉर पीस" रॅली रविवार दि.11 सप्टेंबर
2016 रोजी सकाळी 6 वाजता आयोजित केली आहे.
या रॅलीमध्ये बीड जिल्हा पोलीसांकडून पालीस अधिक्षक अनिल
पारस्कर व इतर पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच डॉक्टर संघटना, पत्रकार संघटना, व्यापारी
संघटना, सराफा संघटना, वकील संघ, पतंजली योगपीठ, रोटरी क्लब, कोचिंग क्लासेस संघटना,
माहेश्वरी महिला मंडळ, विविध महाविद्यालये सहभागी होणार आहेत. ही रॅली पोलीस मुख्यालय
बीड येथून सकाळी 6 वाजता निघून शिवाजी चौक, बलभिम चौक, माळीवेस, डॉ.बाबासाहेब आंबेडकर
चौक मार्गे मोंढा, सावता माळी चौक ते जिल्हा क्रीडा संकुल येथे रॅलीची सांगता होईल.
या रॅलीमध्ये सर्व धर्माचे स्त्रि-पुरुष समाज बांधव, कला, क्रीडा, सामाजिक, राजकीय
इत्यादी क्षेत्रातील तसेच महाविद्यालयातील युवक-युवती यांनी जास्तीत जास्त संख्येने
सहभागी व्हावे असे आवाहन बीडचे पोलीस अधिक्षक यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा