बीड, दि.2:- बीड जिल्ह्यात 2 सप्टेंबर
2016 रोजी सकाळपर्यंतच्या मागील 24 तासात 8.7 मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आज झालेल्या तालुकानिहाय पावसाची
आकडेवारी मिलीमिटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडेवारी यंदाच्या एकुण पावसाचे
आहे.
बीड-4.4 (287.1) पाटोदा- 1.3 (368.8), आष्टी- निरंक (307.7), गेवराई-11.3 (361.4),
शिरुरकासार- 7 (312.3), वडवणी-17.5 (497.3), अंबाजोगाई- 6.4 (418.0), माजलगाव-22 (529.4),
केज- 4 (362.9), धारुर- 2 (313.3) तर परळी वैजनाथ-19.8 (361.4) पावसाची नोंद झाली असून
374.5 मि.मी. एकुण पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 666.36 मि.मी.
असून वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत 56.20 टक्के पावसाची नोंद झाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा