बीड,
दि. 1 :- जिल्हा आस्थापनेवरील लिपीक-टंकलेखक/
कनिष्ठ लिपीक परीक्षा रविवार दि.4 सप्टेंबर 2016 रोजी बीड जिल्हा केद्रावर सकाळी
11 ते 1 या वेळेत व शिपाई संवर्गाची परीक्षा दुपारी 3 ते 4.30 यावेळेत एकुण 14 उपकेंद्रामधून
घेण्यात येणार आहे. लिपिक नि टंकलेखक व कनिष्ठ लिपीक संवर्गाच्या परीक्षेसाठी एकुण
5 हजार 700 व शिपाई संवर्गाच्या परीक्षेसाठी एकुण 7 हजार 998 उमेदवार बसलेले असून परीक्षेच्या
कालावधीत उपकेंद्रावर कोणाताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परीक्षा उपकेंद्रावर पोलीस
बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. तसेच परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रीया
संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.
अध्यक्ष
जिल्हा निवड समिती तथा जिल्हाधिकारी बीड यांच्या सुचनेनूसार या परीक्षेसाठी बसलेल्या
उमेदवारांनी त्यांच्याकडील मोबाईल, पेजर, कॅल्कूलेटरव अभ्यासाचे इतर साहित्य परीक्षा
केंद्रावर घेवून जाता येणार नाही. तसेच लेखी परीक्षेचे आवश्यक साहित्यच उमेदवारांना
जवळ बाळगण्याची मुभा राहिल. तसेच सर्व उमेदवारांनी परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्रासोबतच
त्यांचे स्वत:चे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र व त्याची एक छायाकिंत प्रत सोबत
आणणे आवश्यक आहे. लिपीक नि टंकलेखक/कनिष्ठ लिपीक परीक्षेसाठीच्या उमेदवारांना त्यांच्या
परीक्षा केंद्रावर 10 वाजेपूर्वी तर शिपाई संवर्गातील परीक्षेसाठी उमेदवारांना त्यांच्या
परीक्षा केंद्रावर 2 वाजेपूर्वी उपस्थित रहावे. परीक्षा सुरु झाल्यानंतर केंद्रावर येणाऱ्या उमेदवारांना
कोणत्याही सबबीखाली प्रवेश देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच सर्व परीक्षार्थी
यांनी कोणत्याही भूलथापा अथवा प्रलोभनाला बळी पडू नये. तसेच परीक्षेदरम्यान उमेदवार
गैरमार्गाने कोणतीही कृती करतांना दिसून आल्यास संबंधिताविरुध्द फौजदारी कारवाई करण्यात
येईल याची नोंद घ्यावी. असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा