बीड, दि.3:- बीड जिल्ह्यात 3 सप्टेंबर
2016 रोजी सकाळपर्यंतच्या मागील 24 तासात 3.1 मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आज झालेल्या तालुकानिहाय पावसाची
आकडेवारी मिलीमिटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडेवारी यंदाच्या एकुण पावसाचे
आहे.
बीड-4.4 (291.4) पाटोदा- निरंक (368.8), आष्टी- 1 (308.7), गेवराई-5.4 (366.8),
शिरुरकासार- 7 (319.3), वडवणी- निरंक (497.3), अंबाजोगाई- निरंक (418.0), माजलगाव-
निरंक (529.4), केज- 6 (368.9), धारुर- 4 (317.3) तर परळी वैजनाथ-6.2 (367.6) पावसाची
नोंद झाली असून 377.6 मि.मी. एकुण पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी
666.36 मि.मी. असून वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत 56.67 टक्के पावसाची नोंद
झाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा