बीड, दि.3:-
बीड जिल्ह्यातील दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांच्या कामांची प्रत्यक्ष गावपातळीवर
भेटी देवून पाहणी केल्यानंतर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांकडून आढावा घेतांना ग्रामविकास
राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी विकासकामांना प्रशासनाने अधिक गती द्यावी असे निर्देश
दिले.
बीड जिल्ह्यातील
दुष्काळ निवारणासाठी उपाययोजनांच्या अंमलबजावणीचा आढावा ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी
भुसे यांनी व त्यांचे सहकारी आमदार लोकप्रतिनिधींनी शुक्रवारी केल्यानंतर जिल्हाधिकारी
कार्यालयात त्याची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी राज्यमंत्री भुसे बोलत होते. या
बैठकीस आमदार सुनिल प्रभू, आमदार सुनिल शिंदे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, मुख्य कार्यकारी
अधिकारी नामदेव ननावरे, अप्पर जिल्हाधिकारी अनिल पवार, अनिल जगताप, बालासाहेब पिंगळे,
सुनिल धांडे आदि मान्यवर तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पिण्याच्या
पाण्याची टंचाई असलेल्या गावांना आवश्यकतेनूसार टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो.
गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांनी अशा गरजू गावांचे प्रस्ताव दोन दिवसात जिल्हाधिकारी
कार्यालयाकडे पाठवावेत. त्याप्रमाणे त्या गावांना तात्काळ पाणी पुरवठा सुरु करण्यात
यावा अशी सुचना ग्रामविकास राज्यमंत्री भुसे यांनी केली.
जलयुक्त
शिवार अभियानासाठी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात टंचाईग्रस्त गावे निवडण्यात आली मात्र
आणखी काही गावातही टंचाईची परिस्थिती आहे आणि त्या गावांचा अभियानात समावेश करणे गरजेचे
असल्याचे राज्यमंत्री भुसे यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. जलसंवर्धनाच्या कामांची
गरज लक्षात घेऊन अशा गावात बंधाऱ्यांची कामे प्राधान्याने हाती घ्यावीत अशी सुचना आमदार
प्रभू यांनी यावेळी केली. यासोबत त्यांनी टूकूर सिंचन प्रकल्पाच्या प्रलंबित कामाचा
स्वतंत्र आढावा जिल्हाधिकारी यांनी घ्यावा अशी सुचना करुन सोयाबिन व इतर पिकाच्या नुकसानीविषयी
शेतकऱ्यांना दिलासा देण्याची बाब लक्षात आणून देण्यात आली. सोयाबिनचे क्षेत्र वाढले
आहे. नूकसानीचे पंचनामे, सर्वेक्षण करण्यात यावे असे निर्देशही राज्यमंत्री भुसे यांनी
यावेळी दिले. संजय गांधी निराधार योजनेच्या बैठका नियमित घेण्याची गरज असून निराधारांना
मदतीचा हात देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा. यासंबंधी विशेष मोहिम राबविण्यात
यावी असेही ते म्हणाले.
आमदार
सुनिल शिंदे यांनी केज तालुक्यातील पाहणी दरम्यान अनुभवलेल्या समस्यांविषयी यावेळी
सविस्तर अहवाल देवून प्रश्न निकाली काढण्याबाबत सुचना केली. वीजवितरणातील अनियमितता,
स्वच्छ धान्य दुकानातून धान्याचे वाटप, आरोग्य सुविधा इत्यादी विषयी यावेळी चर्चा करुन
आवश्यकती कार्यवाही करण्याची सुचना करण्यात आली.
अपुऱ्या
पावसामुळे पिकावर पसरत चाललेल्या किड प्रादुर्भावाविषयी सतर्क रहावे लागेल असे सांगून
प्रलंबित असलेल्या पिक अनुदान वाटपाच्या विषयी मंत्रालयात पाठपुरावा करण्यात येईल असे
राज्यमंत्री भुसे म्हणाले दोन दिवसांच्या दौऱ्याचा अहवाल शासनाकडे जाणार असून प्रलंबित
प्रश्न शासनस्तरावरुन मार्गी लावले जातील. असे सांगून त्यांनी पिककर्ज वाटपात सुसुत्रता
असण्याची गरज आहे असेही ते म्हणाले.
शेतकऱ्यांच्या
आत्महत्या हा सर्वात संवेदनशील प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन सतत उभे राहिले आहे मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या
थांबल्या नाहीत. अशा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची मदतीची प्रकरणे निकाली
काढावीत असे सांगून चारा छावण्यांची देयके, रोजगार हमी योजनेतून विहिरी, आमचा गाव आमचा
विकास आदि योजनांच्या अंमलबजावणीबाबत त्यांनी सविस्तर सुचना केल्या.
प्रारंभी
दुष्काळ परिस्थिती निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती
पॉवरपॉईंट सादरीकरणाद्वारे देवून जिल्हाधिकारी राम यांनी सध्यस्थितीत जिल्ह्यातील विविध
उपाययोजना व विकासकामांचा आढावा सांगितला.
स्वच्छ
भारत अभियानाअंतर्गत 1 लाख शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट आहे. नाते जबाबदारीचे ह्या
उपक्रमाची घडीपत्रिका विमोचन यावेळी राज्यमंत्री भुसे यांच्या हस्ते करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा