बीड, दि. 8 :- मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त शनिवार,
दि. 17 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 9 वाजता बीड येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य
ध्वजारोहण कार्यक्रम पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते होणार असून तत्पूर्वी प्रियदर्शनी
उद्यान येथील हुतात्मा स्मृतीस्तंभाला पुष्पहार अर्पण करुन हुतात्म्यांना अभिवादन करण्यात
येणार आहे. अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
ध्वजारोहण समारंभाच्या पूर्वतयारीचा आढावा निवासी उपजिल्हाधिकारी
चंद्रकांत सुर्यवंशी यांनी बैठकीत घेतला. या बैठकीत महसुल, नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम,
शिक्षण क्रीडा, पोलीस आरोग्य, पुरवठा, महावितरण आदी विभागांना आवश्यक त्या तयारीच्या
सूचना करण्यात आल्या.
या बैठकीस विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा