गुरुवार, १ सप्टेंबर, २०१६

बीड जिल्ह्यात 16.9 मि.मी. सरासरी पावसाची नोंद



          बीड, दि.1:- बीड जिल्ह्यात 1 सप्टेंबर 2016 रोजी सकाळपर्यंतच्या मागील 24 तासात 16.9 मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आज झालेल्या तालुकानिहाय पावसाची  आकडेवारी मिलीमिटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडेवारी यंदाच्या एकुण पावसाचे आहे.

बीड-13.5 (282.7) पाटोदा- निरंक (367.5), आष्टी- निरंक (307.7), गेवराई-15.1 (350.1), शिरुरकासार- 6.7 (305.3), वडवणी-39 (479.8), अंबाजोगाई- 13.6 (411.6), माजलगाव-26.2 (507.4), केज- 3.7 (358.9), धारुर- 25.3 (311.3) तर परळी वैजनाथ-43.2 (341.6) पावसाची नोंद झाली असून 365.8 मि.मी. एकुण पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 666.36 मि.मी. असून वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत 54.90 टक्के पावसाची नोंद झाली आहे.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा