गुरुवार, १ सप्टेंबर, २०१६

महाअवयवदान अभियानानिमित्त बीड येथे वाकॅथॉन रॅलीने जनजागृती






बीड, दि. 1 :- महाअवयवदाना संदर्भात जनमानसामध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने 30 ऑगस्ट ते   1 सप्टेंबर, 2016 या कालावधीत जिल्ह्यात महाअवयवदान अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानानिमित्त बीड येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे वाकॅथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवुन या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. नागेश चव्हाण, निवासी वैद्यकीय अधिकारी एच.एस. मोगले, डॉ. सतीश हसदास, डॉ. पाटील, डॉ. कोकणे, डॉ.एस.एस.राठोड, डॉ.आय.व्ही. शिंदे, डॉ. आर.आर. जाजू, जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
ही रॅली जिल्हा सामान्य रुग्णालय येथून निघुन शिवाजी चौक, कारंजा, धोंडीपुरा, माळीवेस, सुभाष रोड, बसस्थानक मार्गे जाऊन जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीमध्ये बीड येथील नर्सिंग कॉलेज, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी आदींनी सहभाग नोंदविला. रॅलीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या हातातील अवयवदानाचे महत्व अधोरेखित करणाऱ्या घोषवाक्याचे फलक सर्वांचे लक्ष वेधुन घेत होते.

-*-*-*-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा