बुधवार, ३१ ऑगस्ट, २०१६

महाअवयवदान अभियानानिमित्त 1 सप्टेंबर रोजी वाकॅथॉन रॅलीचे आयोजन





बीड, दि. 31 :- महाअवयवदाना संदर्भात जनमानसामध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने 30 ऑगस्ट ते   1 सप्टेंबर, 2016 या कालावधीत जिल्ह्यात महाअवयवदान अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानानिमित्त गुरुवार, दिनांक 1 सप्टेंबर 2016  रोजी सकाळी 7.30 वाजता बीड येथे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वाकॅथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. बीड येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे या रॅलीचा शुभारंभ होणार असून ही रॅली शिवाजी चौक, कारंजा, धोंडीपुरा, माळीवेस, सुभाष रोड, बसस्थानक मार्गे जाऊन जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रॅलीचा समारोप होणार आहे. या रॅलीमध्ये बीड येथील नर्सिंग कॉलेज, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांचा सहभाग असणार आहे. अवयवदानाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी नागरिकांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हावे असे अवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा