बीड, दि. 1 :- सार्वजनिक आरोग्य विभागातील महाराष्ट्र वैद्यकिय
व आरोग्य सेवा गट-अ (वेतनश्रेणी 15600-39100 ग्रे.पे.5400) ची रिक्त पदे भरणेबाबत शासनाकडून
जाहिरात क्रमांक 01/2016 दिनांक 16 एप्रिल 2016 अन्वये प्रसिध्द करण्यात आली होती.
जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. या उमेदवारांनी समूपदेशनासाठी
तसेच मुळ प्रमाणपत्राच्या तपासणीसाठी दिनांक 4 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी ठिक 11 वाजता
जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे मुळ प्रमाणपत्रासह उपस्थित रहावे असे आवाहन उपसंचालक,
आरोग्य सेवा, लातूर यांनी केले असल्याचे जिल्हा
शल्यचिकित्सक बीड यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा