बीड, दि. 1 :- शासनाने राष्ट्रीय बाल कल्याण पुरस्कार सन
2015 व 2016 आणि राजीव गांधी मानसेवा पुरस्कार-2016 करीता नामांकन प्रस्ताव मागविणे
सुचित केलेले आहे. त्यानूसार या पुरस्कारासाठी आवश्यक असलेली माहिती, नियमावली व निकष
हे शासनाचे वेबसाईड www.wcd.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या पुरस्कारासाठी जे
समाजसेवक/समाज सेविका प्रस्ताव सादर करु इच्छितात त्यांनी आपले प्रस्ताव चार प्रतीत
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, वरद प्राईड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, धानोरा
रोड, बीड येथे कार्यालयीन वेळेत दि.6 ऑगस्ट 2016 पर्यंत सादर करावेत. असे आर.डी.कुलकर्णी जिल्हा महिला व
बाल विकास अधिकारी, बीड यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा