गुरुवार, १४ जून, २०१८


शासकीय यंत्रणांचे टीमवर्क आणि सोशल मीडीयाचा प्रभावी वापर
हेच खरे यशाचे गमक - जिल्हाधिकारी एम.डी.सिंह
             
          बीड जिल्हा पूर्वीच्या हैदराबाद राज्यातील मराठी भाषिकांपैकी एक जिल्हा आहे.सन १९५६ साली द्विभाषिक राज्याच्या स्थापनेनंतर हा जिल्हा मराठी भाषिक राज्यात म्हणजे महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात आला. ऑगस्ट १९८२ ला मराठवाडा प्रादेशिक विभागाचे व बीड जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले,त्यावेळी या जिल्ह्यातील अंबाजोगाई तहसीलमधील रेणापूर मंडळातील 43 गावे व अकरा वाड्यांचा लातूर जिल्ह्यात समावेश करण्यात आला. बीड जिल्ह्याचे साधारण तीन स्वाभाविक विभाग पडतात-उत्तरेकडे गोदावरी खोऱ्यातील सखल प्रदेश दक्षिणेकडे बालाघाट पर्वताच्या रांगा उंचावरील सपाट प्रदेश आणि उर्वरित कमी अधिक उंचीचा डोंगर टेकड्यांच्या उताराचा आणि सीना खोऱ्याचा भाग आहे.जिल्ह्यात एकूण ११ तालुके असून गावांची संख्या १ हजार ३५७ एवढी आहे.अशा या वैशिष्ट्यपूर्ण बीड जिल्ह्याला  एक कर्तबगार शिस्तप्रिय जिल्हाधिकारी लाभले त्यांचे नाव श्री एम डी सिंह. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीत बीड जिल्हा देशात प्रथम.
          तेलंगणा राज्यातील निजामाबादचे असलेले जिल्हाधिकारी श्री.एम.डी.सिंह हे २०११च्या भारतीय प्रशासकीय सेवेच्या तुकडीतील अधिकारी आणि बी.टेक,सीएस आणि एमबीए असे उच्चविद्याविभूषित. सन २००६ते २०११या कालावधीत श्री.सिंह यांनी HSBC या नामवंत बँकेत सिनियर बिजीनेस ऑफिसर या उच्च पदावर प्रशंसनीय अशी कामगिरी बजावली. आपल्या प्रशासकीय सेवेची कारकीर्द त्यांनी २०१२मध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी कोल्हापूर व नंतर सांगली अशी सुरू केली. त्यानंतर त्यांनी २०१३ ते २०१५ या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात परिविक्षाधीन उपविभागीय अधिकारी म्हणून स्वतःला घडविले आणि मग त्यांनी सन २०१५ ते २०१६ या कालावधीत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अकोला जिल्ह्यात तर २०१६-१७ या कालावधीत चंद्रपूर येथे आपली कारकीर्द गाजविली.  
          बीड जिल्हयाची सूत्रे हाती घेतल्यानंतर जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी  प्रधानमंत्री आवास योजना, शबरी योजना, रमाई आवास योजना यासारख्या विविध योजनांमध्ये विशेष लक्ष घालून प्रभावीपणे व उत्कृष्ट कार्य केले आहे. त्यांनी या योजनांची जिल्हयामध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी केली. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हयातील सर्व तालुक्यातील सर्व गावे हागणदारीमुक्त करण्यात आली. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) योजनेद्वारे  जिल्हयातील गोरगरीब महिलांना स्वयंसहाय्यता गटांद्वारे तसेच  बचतगटांद्वारे स्त्रियांचे संघटन करून त्यांच्यातील उद्योग व्यवसायाला चालना देण्यात  आली. तसेच ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसंघ तर जिल्हा परिषद प्रभाग स्तरावर प्रभागसंघ तयार केले. आणि या संस्थांच्या माध्यमातून गरिबांचे अधिकार, हक्क, वित्तीय सेवा
-2-
-2-

तसेच शाश्वत उपजीविकेच्या  संधी प्राप्त होण्यासाठी वातावरण निर्मिती केली. बीड जिल्हयामध्ये आदर्श गावांमध्ये शासनाच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांद्वारे गावातील नागरिकांना अधिकाधिक सुविधा मिळवून देण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. तसेच  संबंधित गावांना भेटी देऊन योजना यशस्वी होण्यासाठी लक्ष केंद्रीत केले. जलयुक्त शिवार अभियानामध्ये नियोजनपूर्व काम करुन जलस्त्रोत वाढविणे तसेच या योजनेचे  उदिष्टय   साध्य 
करण्याच्या  अनुषंगाने प्रशंसनीय काम केले. मुख्यमंत्री ग्राम परिवर्तन  योजनेंर्गत जिल्हयातील ग्रामपरिवर्तक  दूतामार्फत ग्रामीण भागातील विविध विकास कामांना चालना देवून विकासात्मक कामे केली. पाणी  फांउन्डेशन अंतर्गत बीड जिल्हयातील निवड झालेली गावे पाणीदार करण्याच्या उद्देशाने गावकऱ्यांना प्रशिक्षण तसेच गावामध्ये अधिकारी /कर्मचारी व गावकरी यांच्याद्वारे श्रमदान करुन योजनेची यशस्वी अंमलबजावणी करण्यात जिल्हाधिकारी श्री.सिंह यांनी विशेष परिश्रम घेतले आहे. बीड शहरातील बिंदुसरा नदीवरील पूल सन २००१ मध्ये झालेल्या पावसाने पूर्णपणे वाहून गेला. त्यामुळे वाहतुकीस मोठया प्रमाणावर अडथळा निर्माण झाला होता, हा पूल नव्याने बांधणे हे मोठे आव्हान  होते, परंतु सातत्याच्या पाठपुराव्यामुळे व नियोजनपूर्वक कामामुळे पूलाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. जिल्हातील राष्ट्रीय महामार्ग २११ साठीची भूसंपादन प्रक्रिया व अहमदनगर-बीड-परळी (वै) रेल्वे भूसंपादनाचे आणि मावेजा वाटपाचे काम अंतिम टप्यात असून लवकरच तेही काम पूर्ण करण्यात येणारआहे. या सर्व कामाबरोबरच केंद्र शासनाची विशेष योजना प्रधानमंत्री फसल विमा योजनेची यशस्वीरित्या अमलबजावणी करण्याच्या बाबतीत बीड  जिल्हयाने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
          BLO Net च्या कामामध्येही बीड जिल्हयाने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. रिएडीट आज्ञावलीद्वारे १०० टक्के ७/१२ चे संगणकीकरण करण्यात आले आहे.मिशन दिलासा योजनेतंर्गत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना प्रत्यक्ष गृहभेट देऊन शासनाच्या विविध योजनांतर्गत रोजगार निर्मितीबाबत प्रेरीत करुन विविध शासकीय योजनेचा लाभ त्यांना देणेबाबत कार्यवाही करण्यात आली आहे.
          ३० एप्रिल २०१७ रोजी त्यांनी बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर या जिल्ह्यासाठी त्यांनी दिवस-रात्र मेहनत करून अनेक लोकोपयोगी कामे मार्गी लावली,प्रशासकीय शिस्त निर्माण केली. येथील लोकांना , लोकप्रतिनिधींना आपलेसे केले आणि यातूनच शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना या जिल्ह्यात अत्यंत तडफेने राबविली आणि त्यात उल्लेखनीय यशही मिळविले. या योजनेची यशस्वीरित्या अंमलबजावणी करण्याच्या बाबतीत बीड जिल्हयाने देशात प्रथम क्रमांक मिळविला.या यशाबद्दल नुकताच त्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विशेष सन्मानही करण्यात आला याविषयी अधिक जाणून घेऊ या त्यांच्या या मुलाखतीतून......

-3-

-3-

प्रश्न क्र 1. पिक विमा योजनेच्या अंमलबजावणीत आपण हे यश कसे मिळविले ?

          शेतकऱ्यांचा PMFBY योजनेवर विश्वास निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्वपूर्ण भूमिका बजावली. जिल्हयातील एकूण 6 लाख 51 हजार 783 शेतकऱ्यांपैकी 5 लाख 43 हजार 200 (83%)शेतकऱ्यांनी या योजनेत भाग घेवून 12 लाख 18 हजार 257 अर्जाव्दारे पिकांचे विमासंरक्षण केले. यासाठी जिल्हा प्रशासनाने आकाशवाणी,पेपर, बॅनर, पॅम्पलेट, मार्गदर्शन शिबिरे, सोशल मिडीया (फेसबुक, व्हॉटस्ॲप, व्टिटर, कॉल सेंटर) इ. माध्यमांचा योग्य प्रकारे वापर केल्यामुळे बीड जिल्हयाने देशात सर्वात जास्त पिक विमाव्दारे शेतकऱ्यांच्या पिकाचे संरक्षण केले. 
          पिक विमा भरताना शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होवू नये यासाठी तलाठी, कृषीसेवक यांनी प्रत्येक बँक शाखा, आपले सरकार सेवा केंद्रावर शेतकऱ्यांना अर्ज भरण्यासाठी आवश्यक ती मदत करण्यासाठी आदेशित केले. 
          जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी सोशल मिडीयाचा उत्कृष्टपणे वापर करुन घेतला. यासाठी व्हॉटस्ॲप ग्रुप तयार केला यामध्ये जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे, खासदार डॉ.प्रीतम मुंडे,सर्व आमदार, लोकप्रतिनिधी तसेच विभागीय आयुक्त, औरंगाबाद , पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, (बँक प्रतिनिधी, इन्श्युरन्स कंपनीचे प्रतिनिधी, CSC चे प्रतिनिधी) या सर्वांचा समावेश करण्यात आला होता तसेच या योजनेसंदर्भात एखादी तक्रार प्राप्त होताच  तक्रार ग्रुपवर टाकून संबधित विभागाच्या अधिकाऱ्यामार्फत तक्रारीचे निवारण तात्काळ करण्यात येत होते.
          शेतकऱ्यांना पिक विमा अर्ज दाखल करता यावा यासाठी जिल्हयातील सर्व बँकांना सुट्टीच्या दिवशी देखील पिक विमा अर्ज स्विकारण्यासाठी आदेशित केले. या सर्व उपाययोजनांचा एकत्रित परिणाम जिल्हयातील एकूण 83% शेतकऱ्यांना या योजनेमध्ये समाविष्ट करून घेण्यात आले यामुळे संपूर्ण भारतात व राज्यातही सर्वाधिक शेतकऱ्यांचा पिक विमा काढण्याचा मान बीड जिल्हयाला मिळाला.

   प्रश्न क्र. 2. शासनाच्या कोणकोणत्या विभागाचे पिक विमा योजनेसाठी आपणांस सहकार्य लाभले आहे ? 

          प्रधानमंत्री पिक विमा योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्हयातील सर्वच यंत्रणांनी टीमवर्क म्हणून काम केले.  यामध्ये महसूल विभाग, कृषी विभाग, सहकार विभाग, पोलीस विभाग, बँक विभाग, CSC व्यवस्थापक, ईनश्युरंन्स कंपनी या सर्व विभागांनी उत्कृष्ठ कार्य व  मदत  केली आहे. या सर्वांच्या टीमवर्कमुळेच हे यश मिळाले आहे.

-4-
-4-
प्रश्न क्र.3.  पिक विमा योजनेत आपण किती लोकांना लाभ दिला ? 

          पिक विमा योजनेत जिल्हयात 6 लाख 51 हजार 783 शेतकऱ्यांपैकी 5 लाख 43 हजार 200 (83%)शेतकऱ्यांचे 12 लाख 18 हजार 257 पिक विमा अर्ज भरण्यात आले. खरीप 2016 साठी ही रक्कम रु 232.84 कोटी इतकी होती.

प्रश्न क्र.4. पिकविमा योजनेच्या अंमलबजावणीकरिता आपण कसे नियोजन केले ?

          पिक विमा योजनेमध्ये सर्व संबंधीत यंत्रणांमध्ये समन्वय राखणे सर्वात महत्वाचे होते. सर्व विभागांमध्ये समन्वय राखण्यासाठी व्हाटस्ॲप या सोशल माध्यमाचा प्रभावीपणे वापर करण्यात आला. व्हाटस्ॲप मध्ये सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासकीय यंत्रणेतील सर्व संबधीतअधिकारी, विमा कंपनीचे प्रतिनिधी, CSC चे प्रतिनिधी बँकेचे प्रतिनिधी, जिल्हयातील प्रगत शेतकरी इ. सर्वांचा समावेश करण्यात आला होता. 
          सर्व महत्वाचे शासन निर्णय, प्राप्त तक्रारी या ग्रुपवर टाकण्यात येत होत्या त्यामुळे सर्व यंत्रणांना अद्यावत माहिती तात्काळ उपलब्ध होत होती. जिल्हयातील सर्व बँकांमध्ये कृषीसेवक, तलाठी, यांना पिक विमा अर्ज भरताना शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी उपस्थित राहण्याबाबत आदेशित करण्यात आले होते. पिक विमा या योजनेचा जिल्हयातील नियमित आढावा बैठकांमध्ये समावेश करण्यात आला होता. DLCC मिटींगमध्ये देखील बँकांना नियमितपणे सूचना देण्यात आल्या होत्या. तालुका पातळीवर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरे देखील आयोजित करण्यात आले होते.
          आपले सरकार सेवा केंद्रचालकांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत  पिक विमा अर्ज भरणे संदर्भात प्रशिक्षण शिबिराचे आयोजन, टॅप्लेट, बॅनर इ. व्दारे शेतकऱ्यांना योजनेची माहिती व्हावी यासाठी प्रत्येक बँक तसेच आपले सरकार सेवाकेंद्रामध्ये योजनेची माहिती दर्शविणारे बॅनर लावण्यात आले होते.

प्रश्न क्र.5. या योजनेत आपणांस जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडेआणि खासदार प्रीतम मुंडे यांचे कसे मार्गदर्शन लाभले ? 

 पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पिक विमा योजनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये सर्व यंत्रणांना पिक विमा यशस्वीपणे राबविण्यासाठी सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच पालकमंत्री महोदयांचाही व्हाटस्ॲप ग्रुपमध्ये समावेश असल्यामुळे त्यांना या योजनेविषयी जिल्हयातील परिस्थितीची अद्यावत माहिती होत होती. प्रत्येक स्तरावरील कार्यवाहीची माहिती त्यांना नियमित मिळत  होती. त्याआधारे आवश्यक त्या सूचना, मार्गदर्शन वेळोवेळी पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडून मिळत होते.अशाच प्रकारच्या सूचना,मार्गदर्शनखासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्याकडूनही मिळाले.त्यामुळेच हे यश मिळवू शकलो. 
-5-
-5-
प्रश्न क्र.6. पिक विमा योजना राबवितांना आपला दृष्टीकोन काय होता ?

          बीड जिल्हयामध्ये पावसाचे प्रमाण अनियमित आहे तसेच जिल्हयामध्ये वारंवार दुष्काळ पडत असतो. जिल्हयातील शेती ही प्रामुख्याने पडणाऱ्या पावसावर अवलंबून असल्यामुळे येथील शेतकरी हा नेहमी चिंतीत वातावरणात जगत असतो. प्रधानमंत्री फसल बिमा योजनेव्दारे शेतकऱ्यांची चिंता कमी होवून त्यांना शाश्वत उत्पन्न मिळत राहावे यासाठी हा सर्वोत्तम उपाय आहे. या योजनेमध्ये समाविष्ट शेतकऱ्यांना पावसाच्या अनियमिततेपासून होणाऱ्या चिंतेपासून सुटकारा मिळेल. पाऊस जरी पडला नाही तरी त्यांना योजनेव्दारे नुकसान भरपाई मिळेल. तसेच अतिवृष्टी, गारपीटव्दारे पिकांचा होणाऱ्या नुकसानीचा देखील मोबदला मिळेल.जिल्हयातील प्रत्येक शेतकऱ्याला शाश्वत उत्पन्न मिळत राहावे व कोणत्याही शेतकऱ्याचे नैसर्गिक संकटामुळे नुकसान होवू नये यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहोत.
प्रश्न क्र.7. पिक विमा योजना राबवितांना आपणांस काही अडचणी आल्या होत्या काय ? त्यावर आपण कशी मात केली.
पिक विमा योजना राबविताना प्रामुख्याने तीन अडचणी आल्या होत्या 
1. पिक विमा बॅकेत भरताना होणारी गर्दी
2. वेबसाईट सर्व्हरमध्ये तांत्रिक दोष निर्माण होणे.
3. आधार संदर्भातील अडचणी 
पिक विमा भरताना शेवटच्या टप्प्यामध्ये बँकेमध्ये मोठया प्रमाणावर गर्दी होत असते. गर्दी जास्त असणे तसेच वेबसाईट मध्ये तांत्रिक दोष निर्माण होणे, यामुळे अर्ज दाखल करण्यात विलंब होत असे. कोणताही  शेतकरी या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी सर्व बँका सुट्टीच्या दिवशीही चालू ठेवण्याबाबत आदेशित केले.
          सर्व्हरमध्ये तांत्रिक दोष दिवसा मोठया प्रमाणात येत असल्यामुळे जिल्हयातील सर्व 2 हजार 929 (CSC)चालकांना  रात्रीच्या वेळी अर्ज सादर करण्याचे सुचविले, त्यामुळे बॅंकेवरील गर्दीचा ताण मोठया प्रमाणात कमी झाला  व शेतकऱ्यांना पिक विमा अर्ज सादर करणे शक्य झाले.सर्व्हरमध्ये येणाऱ्या तांत्रिक दोषाबदृदल वरिष्ठ यंत्रणेला अवगत करण्यात आले.
          पिक विमा अर्ज सादर करताना आधार क्रमांक अत्यावश्यक असल्यामुळे 60 वर्षावरील काही शेतकऱ्यांचे बोटाचे ठसे उमटत नसत तसेच त्यांच्या आधार क्रमांकाशी मोबाईल क्रमांक अद्यावत नसल्यामुळे अर्ज सादर होत नव्हते. अशा प्रकारच्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी CSC चालकांना शेतकऱ्यांचे मोबाईल क्रमांक IRIS उपकरणाद्वारे अद्यावत करुन अर्ज सादर करण्याबाबत आदेशित केले. ज्यामुळे जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांचे पिकविमा अर्ज सादर करणे शक्य झाले. या योजनेशी आधार क्रमांक जोडणे अनिवार्य केल्यामुळे पारदर्शकता निर्माण होऊन कोणत्याही शेतकऱ्याद्वारे बोगस पिकविमा अर्ज सादर झाला नाही.
-6-

-6-

प्रश्न क्र.8 पिकविमा येाजना राबवित असताना शेतकऱ्यांच्या जीवनाविषयी आपली संकल्पना कशी होती? 

          शेतकरी हा देशाचा प्रमुख कणा आहे. प्रत्येक शेतकऱ्याला शाश्वत उत्पन्न मिळत राहावे व त्याचे जीवनमान उंचवावे, देशाला विकसित करायचे असेल तर प्रत्येक शेतकऱ्याचा विकास होणे आवश्यक आहे. जिल्हयात वारंवार पडणाऱ्या दुष्काळामुळे व अनियमित पर्जन्यमानामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट होत आहे. पिक विमा योजनेद्वारे शेतकऱ्यांचे होणाऱ्या संभाव्य नुकसानापासून दूर ठेवण्यासाठी ही योजना खूप महत्वाची आहे. चांगले पर्जन्यमान झाले तर उत्तम पिकाद्वारे शेतकऱ्याचे जीवनमान उंचावेल,  त्याचबरोबर अतिवृष्टी किंवा दुष्काळासारख्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही याची काळजी घेता येईल. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणा व त्यांना शाश्वत उत्पन्नाची खात्री देणे यासाठी हया योजनेत जिल्हयातील प्रत्येक शेतकऱ्याचा समावेश व्हावा म्हणून संपूर्ण प्रशासनाने दिवसरात्र मेहनत घेतली.
प्रश्न क्र.9. पिक विमा योजनेसारख्याच शासनाच्या आणखी काही योजनांचा शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी किंवा जिल्हयाच्या विकासासाठी आपले पुढील ध्येय काय आहे ?
          जिल्हयातील शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळण्याच्यादृष्टीने तसेच जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या खालील योजना प्रभावीपणे राबविण्याच्या अनुषंगाने सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.
1. जलयुक्त शिवार अभियान 2) मागेल त्याला शेततळे,3) गट शेती 4) POCRA Villages
प्रश्न क्र.10. या योजनेसाठी आपण लाभार्थींच्याही भेटी घेतल्या, याबद्दल आपला अनुभव काय?
या योजनेची यशस्वी अंमलबजावणी  करण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांच्या नियमितपणे भेटी घेण्यात आल्या होत्या. यावेळी त्यांना या योजनेचे महत्व तसेच या योजनेतून होणारा फायदा या सर्वांची इत्यंभूत माहिती देण्यात येत होती. कृषी विभागामार्फत प्रत्येक गावात मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. जिल्हयातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेद्वारे या योजनेची माहिती देण्यात आली होती.
प्रश्न क्र.11.पिक विमा योजनेतून आपण इतर जिल्हयाला काय संदेश देऊ इच्छिता ?
          पिक विमा योजना ही शेतक-यांना शाश्वत उत्पन्न मिळवून देणारी खात्रीशीर योजना आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना कोणत्याही नैसर्गिेक संकटावर मात करता येते, यामध्ये नैसर्गिक संकट (जसे दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट) दरम्यान होणाऱ्या पिेकांच्या नुकसानीची भरपाई देण्याची खात्री देण्यात आलेली आहे. सर्व शेतकऱ्यांना या योजनेमध्ये सहभाग नोंदवावा यासाठी जिल्हापातळीवर प्रयत्न करणे आवश्यक आहे.

-7-
-7-

प्रश्न क्र.12. आपल्याला मिळालेल्या या यशाबद्दल आपणास आपले अनुभव ऐकण्यासाठी इतर जिल्हे/ राज्यही उत्सुक असतील, याबद्दल काय सांगाल ?

          मार्गदर्शन- हो,हे खरे आहे. नुकतेच ओरिसा राज्याच्या विनंतीवरून प्रधानमंत्री फसल बिमा योजना त्या  राज्यामध्ये अधिकाधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी  त्या राज्यातील सर्व उपनिबंधक, सहाय्यक उपनिबंधक, सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सहकार विभागाच्या मा. प्रधान सचिव श्रीमती रंजना चोप्रा, मा.डॉ. त्रिबिकराम प्रधान, सचिव, सहकारी संस्था यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शन केले. इतरही काही राज्यांमधूनही या विशयाबाबत मार्गदर्शन करण्याकरिता मला आमंत्रित करण्यात आले आहे.
-*-*-*-*-
मनोज शिवाजी सानप
जिल्हा माहिती अधिकारी,
बीड

बुधवार, १३ जून, २०१८


                           येरे घना                                  ललित लेख
त्याची वाट पाहत ती किती तरी दिवसापासून आस लावून बसली होती त्याच्या आगमनाकडे, एखद्या दगडी पुतळयासारखी डोळे सताड उघडे ठेवून. त्याच्या  येण्याची चाहूल लागली की, ती खूप खूप आनंदून जायची. मनमोराच्या पिसा-यावर अनेक रंग उमलुन यायचे. आकाशात ढगांनी गर्दी केली की तीला वाटायचे आज मात्र तो नक्कीच येईल, तीला कवेत घेण्यासाठी. त्याच्या अलिगंनाने ती हर्षभरित होऊन गीत गुण गुणू लागेल या अपेक्षेत. सकाळच्या ढगाळ वातावरणाने तिच मन  प्रफुल्लीत होऊन पावसाच गाण होऊन जायचे.
                                                                                                   बेबीसरोज ग.अंबिलवादे,(लोळगे)
                                                                                                         जिल्हा माहिती कार्यालय,
                                                                                                                     बीड
                                                                                                        भ्रमणध्वनी 9921136185
 सकाळीच आकाशात ढगाच्या डोंगरानी गर्दी केली होती. पुर्वदिशेला उगवणा-या सुर्याचेही तिला दर्शन झाले नव्हते. आकाशाला गडद काळया वस्त्रांनी व्यापून टाकल्याने सुर्यदेव आपल्या तेजाची कोवळी किरणे आपल्या प्रियतमेला देऊ शकत नव्हता. ढगांच्या आडव्या तिडव्या डोगंराच्या पर्वतरांगा तपस्वयाच्या जटा पिजांरलेल्यासारख्या दिसत होत्या. क्षणात ती ढगांची मैफल दूर दूर पळतांना पाहून ती हर्षभरित होऊन त्याच्यांकडे टक लावून पाहत रहायची. त्यांचा हा पाठशिवनीचा खेळ तीला खूप खूप आवडायचा. पण वा-याच्या जोराने ती ढगांची माळ दूर दूर निघून जायची आणि त्या जागेवर काळया पट्टयाची चादर तयार व्हायची. काळया चादरीबरोबरच  ढगातुन कड कडाट करणारी विजांची सौदामिनी घनघोर  गर्जनाचा आवाज करत तीला घाबरवून टाकायची. देवेंद्राची बलशाली शक्ती तिचा लवाजमा घेऊन पृथ्वीवर निघायची, तेव्हा ढोलताशाच्या गजरात ती  विजाचा लखलखाटासह चमकून जायची.
तीला असं वाटु लागायची की,  तो असा अक्राळ विक्राळ  रुप घेऊन कोसळेल. त्याच्या टपो-या थेबांच्या अल्हड स्पर्शाच्या कल्पनेने तीची काया रोमांचित होऊन जायची. घनगर्द मेघातुन जराशी प्रकाशाची किनार लेवून आलेली दिसली की, तीला वाटायचे माझा सखा आकाशातील त्या काळया किनारी किनखापी गलफाच्या पाठीमागे लपला आहे. त्याची किनार दूर सारुन तो पावसाच्या थेंबातुन नक्कीच खाली येईल. वासुकी सर्पाच्या फुत्कारासारख्या पर्जन्यधारा धरणीवर कोसळतील अन् हे उत्कट उर्मीचे क्षण कांचन डबीत बंदीस्त करुन ठेवील, असे विचार ती मनाशीच करीत झाडाच्या बुथ्यांशी उभी होती. त्याला अंगावर झेलण्यासाठी. त्याचा स्पर्श संर्पुण अंगाला व्हावा या उद्देशाने तिन आज किमती छत्रीही अडगळीत भिरकावून दिली होती.
तीला वाटत होते. त्याच्या कर्तव्याला तो कधीच चुकणार नाही. अन् दरवर्षीच तो असाच अचानक येतो आणि तीला अचंबित करतो. तिच्या आंगणात,परसबागेत,घराच्य खिडकीतून बळजबरीने मधे घुसून तिच्यावर वर्षाव करतो. तिच्या तनामनाला न्हाऊ घालतो. अन् पून्हा निघून जातो त्याच्या मुक्कामाच्या गावी, कुठलाच पत्ता  न देता. यावेळेस मात्र त्याने दोन महिन्यापासून तिचा छळ मांडला होता. तिला येण्याचे संकेत देत तो मात्र दुस-याच मार्गाने निघुन जात होता. ती हिरमुसली होऊन त्याचा माग काढत काढत दाही दिशा फिरत होती पण त्यावा थांगपत्ता मात्र कुठेच लागत नव्हता. त्याला पत्र पाठवून लवकर परत बोलावावे म्हटले तर ती  त्यचा पत्ता घ्यायलाच विसरली होती.
ती आता कुंठीत झाली होती. बंद पडद्याच्या पापण्यात तिन थोडासा पाऊस साठवला  होता. तोच आता थेंबाच्या रुपाने तिच्या आरक्त गालावर पाझरला होता,तिन  हलकेचे टिपले ते अश्रुचे थेंबअन म्हणाली माझ्या डोळयतला पाऊस वाहुन जातोय माझ्या गालावरुन, तरीही तुला यावस वाटत नाही का? माझ्या भेटीला, असा का? रुसलासरे वरुणराज्या माझ्यावर आणि माझ्या सर्वच शेतकरी राज्यांवर? तुला काहीच दया येत नाही कारे  त्यांची? माझ्यावर रुसला असेल तर मला नको घेऊ तुझ्या मिठीत पण माझ्या इतर बांधवांना तरी असा त्रास देऊ नकोस. मी राहील तुझ्याविना अशीच किती तरी काळ तिष्ठत उभी पण या मुक्या प्राण्याचेही तुला काहीच वाटत नाही का? बघ ती पशु पक्षी,मुकी जनावरे कशी तडफडताहेत तुझ्या थेंबावाचून, चातकही शिणला आहे तुझ्या आगमनाची वाट पाहून, त्याचा प्राण निघू पाहत आहे ताहनेने, हिरवळ करपून गेलीय तुझ्या अठवणीने ती जीव सोडण्याच्या मार्गावर आहे, पक्षाचे थवे कोरडा पाणवठे पाहून फिरताहेत वनवन,ताहन न भागल्याने जाताहेत मृत्यूच्या कवेत. वाडया वस्त्यावर पाण्याची भांडी घेऊन लेकर फिरताहेत पाण्याच्या शोधात पण पाण्याचा थेंबही प्यायला मिळत नाही. घोटभर पाणीही नाही घसा कोरडा पडला तर प्यायला. तेव्हा त्यांच्या  डोळयाचे पाझरही आटलेत कोरडी ठणठणीत  झालीत पाणी तरी कुठून गाळणार डोळयातुन. कुठून आणतील पाणी पिण्याला. धरणाची काया उघडी पडली, नदीची माया तर केव्हाच आटली, कोरडेठाक पात्र पाहून किनारेही फिरवाताहेत पाठ,हिरवळीने नटलेला पर्वताचे सौदर्य पडले आहे फिके त्यामुळे दगडगोटयाच्या सोबतीशिवाय कोणीच नाही देत त्याला साथ. हिरवळच नसल्याने माणसही पळताहेत दूर शोधताहेत कुठे मिळतो का? अशेचा अंधकसा किरण.
दोन महिने उलटली तरी तु मात्र आहेस बिनधास्त. तुला आकाश सोडून यावच वाटत नाही का? उजाड धरतीचा पाहण्यास वास. तु नुसताच दिसतोस, ढगांच्या आड लपतोस, अस वाटत तू किती किती  धावत येशील,कुठलाही धरबंध न ठेवता बेभान होऊन कोसळशील, विहीरी,बारवा तुडंब भरवशील, नदीच्या पात्रात धडकून तिची ओटी पाण्याने भरवशिल, डोगर रागांत ओहळ होऊन वाहशील पण तुला ढगातुन खाली उतरवावस वाटत नाही. कारण या माणुस नावाच्या प्राण्यांनी खूप छळल आहे तुला. तुझे सोबती वृक्षराज यांच्या कतली करुन मांडला लिलाव. कारखाण्याच्या  धुराने कोंडलाय तुझा श्वास,प्ल्स्टीकच्या कच-याने केलाय तुझा घात, कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी केमीकलने होतोय तुझ्यावर विषारी मारा, म्हणून तर तु रुसला नाहीसनारे आमच्यावर पण तु समजून घे अन् या स्वार्थी माणसाला  माफ करुन ये पुन्हा तुझ्या वंसूधरेला चिंब चिंब भिजवण्यासाठी,  दाखव तुझा निस्वार्थीपणा अन कर सर्वावर धुव्वाधार वर्षाची वृष्टी. आरे माणूस कसाही जगेल पण तुझ्या सानिध्यात, तुझ्या जीवावर जगणारे मुकी जनावरे,पशु पक्षी काय खातील पितील याचा तरी विचार कर, माणसासाठी नाही पण त्यांच्यासाठी तरी सोड तुझा रुसवा, घे कुशीत या धरनीला अन् भिजव प्रेमाने पुन्हा नव्याने बहरण्यासाठी.
 नको देऊ हुलकावणी ,नको फिरवून जाऊस तोंड, करुन टाक बरसात धुमधडाक्यात, आता आम्ही लावणार आहोत वृक्ष असख्यांत, तुझी अवकृपा होऊ नये म्हणून शाहणी होणार आहे माणूस जात. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी,तुझी कृपा वेळेवर होण्यासाठी आम्ही सरसावलो आहोत वृक्ष लावण्यास. तेव्हा तू ये धो धो अवकळागत अन् घे तुझ्या प्रियतमेला तुझ्या बहुपाशात,तिचे डोळे त्रसले आहे तुझा अवखळपणा पाहण्यास,कायाही शिणली आहे तुझ्या अंलिगणास.आता लावू नकोस वाट पाहण्यास नाही तर विश्वासच नाही राहणार तुझ्यावर तूझ्या या वेडया वंसुधरेचा, ती भेगाळतच जाईल अन निकृष्ट होईल तृणावाचून निर्जिव होईन मग कुणाच्या कुशीत तु ठेवशील मान, आता सोड तु अबोला अन् ये तिचा हात हाती घेण्यास. असा नुकताच लंपडाव खेळु नकोस ढगांच्या मेळयात, तुझी अस धरुन बसलीय ती पाहत आभाळात,करुन दृष्टीने अस लावून, म्लान वदनाने तुझ्याकडे पाहत,आता देऊ नकोस तीला हुलकावणी,होऊदे तुझा राग अनावर ये गर्जना करुन अन् घाल धिंगाना पृथ्वीच्या माथ्यावर जलमय करुन टाक तिची कुस,होऊदे अबादानी बळीराजाची घर,येरे घना न्हाउ घाल त्रासलेल्या जीवानां.   




शनिवार, १९ मे, २०१८


जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी
बिंदूसरा पुलाची केली पाहणी

          बीड,18:- जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी  बीड येथील बिंदूसरा नदीवरील पुलाची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व उपस्थित संबधित अधिका-यानां योग्य त्या सूचना केल्या. यावेळी त्यांच्या समवेत निवासी उपजिल्हाधिकारी,चद्रकांत सुर्यवंशी,उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार अविनाश सिंगटे, पोलीस उप अधिक्षक सुधिर खिरडकर  यांच्यासह आय आरबीचे अधिकारी,  शहरातील नागरिक उपस्थित होते.


  
      
4 वर्षे भारताच्या नवनिर्माणाची
सर्वांची साथ: सर्वाचा विकास 
लोकराज्य अंकाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रकाशन
बीड,दि.18 - माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य या मासिकाच्या मे  2018 च्या 4 वर्षे भारताच्या नवनिर्माणाची सर्वांची साथ: सर्वाचा विकास या लोकराज्य अंकाचे प्रकाशन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्या हस्ते शुक्रवार  दि.18 मे 2018 रोजी    जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे करण्यात आले. यावेळी  निवासी उपजिल्हाधिकारी चद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा माहिती कार्यालयाच्या अ. माहिती अधिकारी श्रीमती बेबीसरोज अंबिलवादे उपस्थित होते.
 माहिती व जनसंपर्क विभागामार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या लोकराज्य अंकात एम.पी.एसी. तसेच विविध पदाच्या परिक्षार्थीसाठी उपयुक्त माहिती असून अंक वाचनिय आहे.  माहे मे 2018 चा  लोकराज्य अंक खरेदी करण्याचे आवाहन जिल्हा माहिती कार्यालय,बीड यांच्यावतीने  करण्यात येत आहे.
-*-*-*-*-*-


शुक्रवार, २७ एप्रिल, २०१८


महाराष्ट्र दिनानिमित्त बीड येथे
1 मे रोजी पालकमंत्री ना.पंकजा मुंडे
यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण
            बीड, दि.27 :-  महाराष्ट्र दिनाच्या 58 व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार, दि. 1 मे 2018 रोजी बीड येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सकाळी 8.00 वाजता राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी दिली.
          जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र दिन समारंभाच्या पूर्व तयारी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी सर्व संबंधित विभागांना पूर्व तयारीबाबत सूचना देवून कामांचा आढावा घेतला. ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ सकाळी 8.00 वाजता होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 7.15 वाजता जिल्हाधिकारी यांच्या हस्ते तर जिल्हा मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये सकाळी 6.55 वाजता निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न होणार आहे.   या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांना मुख्य समारंभास उपस्थित राहता यावे यासाठी या दिवशी  सकाळी 7.15 ते 9 च्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अशासकीय समारंभ करण्यात येवू नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास  त्यांनी तो समारंभ सकाळी 7.15 वाजण्यापूर्वी किंवा 9 वाजेनंतर करावा तसेच ध्वजारोहण कार्यक्रमास सर्व अधिकारी कर्मचा-यांनी शासकीय पोषाखात उपस्थित रहावे, असे सांगून श्री.सुर्यवंशी यांनी पोलीस विभाग, महसूल विभाग, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, क्रीडा, गृहरक्षक दल, नगर परिषद, शिक्षण संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना पूर्वतयारी कामांविषयी विविध सूचना दिल्या. या बैठकीस  सर्व संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.-*-*-*-*-
वृत्त्‍ क्रमांक:- 383                           
                                                    महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी
बीड जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी
लोकप्रतिनिधींच्या हस्ते ध्वजारोहण
       
          बीड, दि. 27 :- दि.1 मे 2018 रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन साजरा करण्याच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी सकाळी 8.00 वाजता ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ लोकप्रतिनिधींच्या हस्ते करण्यात येणार आहे. शिरुर कासार येथे आ.जयदत्त क्षीरसागर, आष्टी येथे आ.भिमराव धोंडे, माजलगाव येथे आ.आर.टी.देशमुख, गेवराई येथे आ.लक्ष्मण पवार, केज येथे आ.संगीता ठोंबरे, परळी वैजनाथ येथे धनंजय मुंडे, विरोधी पक्ष नेता महाराष्ट्र विधान  परिषद, अंबाजोगाई येथे आ.विनायक मेटे, विधान परिषद सदस्य आणि पाटोदा येथे आ.अमरसिंह पंडीत, विधान परिषद सदस्य यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा समारंभ संपन्न होणार आहे. तरी या समारंभास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
-*-*-*-*

बुधवार, २५ एप्रिल, २०१८


 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या मागण्यांची
                    संबधित अधिका-यांनी पुर्तता करुन अहवाल सादर करावेत
                                                     अपर जिल्हाधिकारी बी.एम.कांबळे

                     
       बीड,दि,025:- शेतकरी आत्महत्या बाबत अपर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी आत्महत्या बाबत जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या अपेक्षाचा आढावा घेतला व त्यांच्या मागणीनुसार त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला त्वरित लाभ मिळवून देण्यासाठी संबतिध अधिका-यांनी दोन दिवसात अहवाल सादर करण्याच्या सूचना श्री. कांबळे यांनी यावेळी दिल्या.
          बीड जिल्हयातील आत्महत्याग्रस्त शेतक-यांचा एकूण 14 प्रकरणाचा आढावा घेतांनी  अपर जिल्हाधिकारी बी.एम कांबळे यांनी आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुबियांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी शासनाकडून काय अपेक्षा आहेत असे विचारले. यावेळी 14 प्रकरणातील आत्महत्याग्रस्त प्रत्येक कुटुंबियातील व्यक्तींनी शासनाकडून विहीर,शेळया,म्हशी,मुलांच्या शिक्षणाचा खर्च,मुलांच्या औषधोपचारासाठी खर्च, त्यांच्या विधवा पत्नीला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ शासनाकडून मिळावा तसेच सुशिक्षीत मुलगा असेल तर त्याला शासकीय नोकरी मिळावी अशा अपेक्षा व्यक्त केल्या.
          या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी चद्रकांत सुर्यवंशी, प्रभारी जिल्हा पोलीस अधिक्षक अजित बोराडे,अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला,उपजिल्हाधिकारी रोहयो महेंद्र कांबळे, उपविभागीय अधिकारी  विकास माने,उपविभागीय अधिकारी, तहसीलदार,ग्रामसेवक,आत्महत्याग्रस्त शेतक-यांचे प्रतिनिधी जीवनराव बजगुडे,संबधित अधिकारी व आत्महत्याग्रस्त शेतक-यांचे विविध तालुक्याच्या गावातील कुंटुंबिय उपस्थित होते.******


       

गुरुवार, १२ एप्रिल, २०१८


लोकराज्यच्या ‘महामानवाला अभिवादन’ या विशेषांकाचे
पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते प्रकाशन
बीड,दि.12 - माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य या मासिकाच्या एप्रिल 2018 च्या ‘महामानवाला अभिवादन’ या विशेषांकाचे प्रकाशन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांच्या हस्ते शिरुर (कासार) जि. बीड येथे शुक्रवार दि.11 एप्रिल 2018 रोजी  झाले. यावेळी आमदार भिमराव धोंडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोल्हार, माजी आमदार गोविंद केंद्र, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती संतोष हंगे आदि मान्यवर तसेच जिल्हा माहिती कार्यालयाचे श्रीमती बी.जी. अंबिलवादे, ना. गो. पुठ्ठेवाड उपस्थित होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 एप्रिल 2018 रोजीच्या 127 व्या जयंतीनिमित्त माहिती व जनसंपर्क विभागामार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या महामानवाला अभिवादन या विशेषांकातील सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची पत्रकार मधू कांबळे यांनी घेतलेली मुलाखत, राजषी शाहू आणि डॉ. आंबेडकर (डॉ.जयसिंगराव पवार), परिवर्तनाचे अग्रदूत (डॉ. शैलेंद्र लेंडे), जलनीतीचे उद्गाते (अविनाश आ. चौगुले), ऊर्जाशक्तीला चालना                         (डॉ. जी. एस. कांबळे), उत्कृष्ट संसदपटू आणि शिस्तप्रिय प्रशासक (डॉ.संभाजी खराट), बाबासाहेबांची जयंती कधी आणि कोणी सुरु केली ? महामानवाचा स्मृतिगंध (मिलिंद मानकर), ग्रंथकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (डॉ. संदेश वाघ), बुद्विवादीची प्रेरक शक्ती (प्रा. डॉ. म. सु. पगारे), शिक्षणाची मुहुर्तमेढ (दत्ता गायकवाड ), शांततामय सहजीवनाचे हमीपत्र (डॉ. अक्रम ह.पठाण), महामानवाचा जीवनपट, समतेचा उद्गाता (प्रा. नागसेन भीमरावजी ताकसांडे), प्रेरणा , ऊर्जा आणि स्फूर्ती देणारी तीर्थस्थळे (डॉ. बबन जोगदंड ), सुरक्षेचा प्रहरी (डॉ. विजय खरे), ज्येष्ठ विचारवंत डॉ.गंगाधर पानतावणे यांच्यावरील दलित साहित्याचा आधारवड (यशवंत भंडारे), आदि लेख वाचनीय आहेत.  जास्तीत जास्त नागरिकांनी महामानवाला अभिवादन  हा माहे एप्रिल 2018चा  लोकराज्य विशेषांक खरेदी करण्याचे आवाहन जिल्हा माहिती कार्यालय,बीड यांच्यावतीने  करण्यात येत आहे.
-*-*-*-*-*-




मंगळवार, ३ एप्रिल, २०१८


जिल्हा माहिती कार्यालय, बीड                                                                                 दिनांक : 3 एप्रिल  2018
दूरध्वनी  क्रमांक  (02442) 222327                                                                       e-mail : diobeed1@gmail.com
                                                                        महाराष्ट्र शासन                              
 dgiprdiobeed.blogspot.in           @DioBeed                जिल्हा माहिती कार्यालय बीड      diobeed1@gmail.com
वृत्त क्र. 140
                           राज्यसेवा पूर्व परीक्षा सात उपकेंद्रावर;
केंद्र परिसरात 144 कलम लागू
                   
          बीड, दि. 3 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा पूर्व परिक्षा-2018 नूसार बीड जिल्हा केंद्रावर दि. 08 एप्रिल 2018 रोजी एकुण 2 हजार 496 उमेदवारांची परीक्षा दोन सत्रात घेण्याचे निश्चित आहे. त्यानूसार 07 उपकेंद्रावर परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्राचे परिसरात 144 कलम जारी करण्यात आले आहे.परीक्षा केंद्र खालीलप्रमाणे.
चंपावती माध्यमिक विद्यालय,नगर रोड,बीड,भगवान विद्यालय,धानोरा रोड,बीड,संस्कार विद्यालय,नवीन इमारत भाजी मंडई,बीड,गुरुकुल इंग्लीश स्कुल,जालना रोड,बीड, शिवाजी विद्यालय,कॅनालरोड बीड,श्री. छत्रपती शाहू माध्यमिक विद्यालय, शाहू नगर बीड आणि डॉ. बापूजी साळूंके माध्यमिक विद्यालय,डी.एड.कॉलेज,सिव्हील हॉस्पीटल मागे, बीड या सात उपकेंद्रावर होणार आहे.
          परीक्षेच्या वेळी परीक्षार्थी सोबत त्यांचे नातेवाईक, मित्र आणि हितचिंतक परीक्षा केंद्राच्या परीसरात जमा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे  परीक्षा केंद्राचे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि असे प्रसंग निर्माण झाल्यास केंद्र प्रमुख,  पर्यवेक्षक, समवेक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना परीक्षा सुरळीतपणे पार पाडणे अडचणीचे होईल. परिक्षा केंद्राच्या परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी व अनाधिकृत कृत्ये होऊ नयेत या करीता बीडचे  निवासी उपजिल्हाधिकारी यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेचे 1973 चे कलम 144 मधील शक्तीचा वापर करुन आदेशीत केले आहे की परीक्षेच्या दिवशी केंद्र परिसरात परीक्षा सुरु होण्याच्या एक तास अगोदरपासून ते परीक्षा संपेपर्यंत पेपर संपेपर्यंत 100 मिटर अंतरापर्यंत शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या अधिकारी-कर्मचारी, परिक्षार्थी यांच्या व्यतिरीक्त दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र  येण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.
          परिक्षार्थीनी परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्र, स्वत:चे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोअर् किंवा ड्रायव्हींग लायसन्स (स्मार्ट कार्ड प्रकारचे) यापैकी कोणतेही एक ओळखपत्र व त्याची छायांकित प्रत सोबत ठेवणे आवश्यक आहे.
     तसेच परीक्षा केंद्रापासून 100 मिटर अंतराच्या परिसरात फोटोकॉपी, ई-मेल, इंटरनेट सुविधा, इतर दळणवळण व संदेश कोणत्याही व्यक्तीजवळ मोबाईल, वायरलेससेट, कॅल्क्युलेटर, लॅपटॉप, कॉम्प्युटर बाळगण्यास तसेच झेरॉक्स, एसटीडी मशीन चालु ठेवण्यास व ध्वनीक्षेपक वाजवण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. वेळेअभावी प्रत्येक इसमास नोटीस देणे शक्य नसल्यामुळे तसेच वेळेअभावी हा आदेश प्रत्येक इसमावर तामील करणे शक्य नसल्यामुळे फौजदारी संहिता 1973 चे कलम 144 (2) अन्वये हा एकतर्फी आदेश देण्यात आला आहे. असे बीडचे निवासी उपजिल्हाधिकारी  यांनी आदेशात नमुद केले आहे.
-*-*-*-*-




वृत्त क्रमांक:-141
 त्रैमासिक विवरणपत्र ईआर
ऑनालाईन भरण्‍याच्या सूचना.
                  बीड दि.3:-ºÉä´ÉɪÉÉäVÉxÉ EòɪÉÉDZɪÉä ( Ê®úCiÉ {Énäù ºÉCiÉÒxÉä +ÊvɺÉÚÊSÉiÉ Eò®úhÉä ) +ÊvÉÊxÉªÉ¨É 1959 Eò±É¨É 5 (1) (2) +ÉÊhÉ ÊxɪɨÉɴɱÉÒ 1960 ÊxÉªÉ¨É Gò. 6 +x´ÉªÉä ¤ÉÒb÷ù ÊVɱÁÉiÉұɠ ºÉ´ÉÇ Eåòpù ¶ÉɺÉxÉ, ®úÉVªÉ ¶ÉɺÉxÉ, ÊxɨɶÉɺÉEòÒªÉ EòɪÉÉDZɪÉä, ¶ÉɺÉEòÒªÉ +ÆMÉÒEÞòiÉ ={ÉGò¨É, ¨É½þɍɯb÷³äý, ºlÉÉxÉÒEò º´É®úÉVªÉ ºÉƺlÉÉ  ´É VªÉÉ JÉÉVÉMÉÒ +ɺlÉÉ{ÉxÉäiÉ 10 ËEò´ÉÉ iªÉÉ{ÉäIÉÉ VÉɺiÉ ¨ÉxÉÖ¹ªÉ¤É³ý +ºÉ±É䱪ÉÉ +ɺlÉÉ{ÉxÉÉ ªÉÉÆxÉÒ EòÉè¶É±ªÉ Ê´ÉEòɺÉ, ®úÉäVÉMÉÉ®ú ´É =tÉäVÉEòiÉÉú ʴɦÉÉMÉÉSÉä website:www. mahaswayam.in ªÉÉ ºÉÆEäòiɺlɳýÉ´É®ú ¨Éɽäþ ¨ÉÉSÉÇ-2018 +JÉä®úSÉä jÉè¨ÉÉʺÉEò Ê´É´É®úhÉ{ÉjÉ E.R.-1 On Line Generate Eò®úÉ´Éä ´É Generated E.R.-1
SÉÒ Print ÊVɱ½þÉ EòÉè¶É±ªÉ Ê´ÉEòÉºÉ ®úÉäVÉMÉÉ®ú ´É =tÉäVÉEòiÉÉ ¨ÉÉMÉÇnù¶ÉÇxÉ Eåòpùù, VÉɪÉEò´ÉÉb÷Ò ´ÉºÉɽþiÉ, VÉÖxÉä ʴɸÉɨÉMÉÞ½þ,xÉMÉ®ú ®úÉäb÷, ¤ÉÒb÷ù ªÉälÉä ºÉÉnù®ú Eò®úÉ´ÉÒ.              
               On Line Generate Eäò±Éä±Éä E.R.-1 ¨ÉÖnùiÉÒiÉ ªÉÉ EòɪÉÉDZɪÉÉºÉ ºÉÉnù®ú Eò®úhªÉÉiÉ ªÉÉ´É Genaratated  E.R.-1 ºÉÉnù®ú xÉ Eò®úhÉÉ-ªÉÉ +ɺlÉÉ{ÉxÉÉ Ê´É°ürù +ÊvÉÊxÉªÉ¨É 1959, ÊxÉªÉ¨É 1960 ´É Eò±É¨É 6 +x´ÉªÉä nÆùb÷Éi¨ÉEò EòɪÉÇ´ÉɽþÒSÉÒ iÉ®úiÉÚnù +ɽäþ.
On Line Generate Eäò±Éä±Éä E.R.-1 ¨ÉÖnùiÉÒiÉ ªÉÉ EòɪÉÉDZɪÉÉºÉ ºÉÉnù®ú Eò®úhªÉÉiÉ ªÉÉ´Éä.
 
 E.R.-1 Generate Eò®úhªÉÉSÉÉ EòɱÉÉ´ÉvÉÒ  01.04.2018 iÉä 30.04.2018

xÉÉånùhÉÒ xÉ Eäò±É䱪ÉÉ +ɺlÉÉ{ÉxÉÉÆxÉÒ On Line xÉÉånùhÉÒ Eò¯ûxÉ PÉähÉä ¤ÉÆvÉhÉEòÉ®úEò +ɽäþ.
वृत्त्‍ क्रमांक:- 142
शुभ कल्याण मल्टी स्टेट को.-आपरेटिव्ह सोसायटीत
ठेवी ठेवणा-या नागरिकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात संपर्क साधावा
         बीड,दि,3:- शुभ कल्याण मल्टी स्टेट को- ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लि. हावरगांव ता. कळंब जिल्हा उस्मानाबाद शाखा अंबेजोगाई,माजलगांव,केज,धारुर,आष्टी आणि परळी या शाखेतील ठेवीदारांच्या ठेवी मुदत संपूनही पतसंसथेने त्यांच्या ठेवी परत दिलेल्या नाही अशा स्वरुपाच्या तक्रारी पोलीस अधीक्षक कार्यालयातील गुन्हे शाखेकडे प्राप्त झाल्या असून त्यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सर्व गुन्हयाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा बीड यांकडुन चालु आहे.
               बीड येथील नागरिकांनी अशा ठेवी ठेवल्या असल्यास त्यांनी ठेवीचा दस्ताऐवजासह आर्थिक गुन्हे शाखा पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या संपर्क साधावा असे, सहाय्यक पोलीस निरिक्षक आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय बीड यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.*********
वृत्त क्रमांक:-143
श्रावण बाळ योजने अंतर्गत लाभार्थ्यांनी
मंजूर अनुदानाची यादी नोटीस बोर्डवर पाहावी
         बीड,दि,3:- सर्व संगायो/ श्रावणबाळ योजने अंतर्गत मंजूर झालेल्या लाभार्थ्यांचे अंगठे उलटत नसल्यामुळे त्यांचे बँकेत पैसे जमा होत नाहीत. अशा  एकुण 343 लाभार्थ्यांचे अनुदान एस बी. आय, कॉनरा बँक, महाराष्ट डीसी सी या बॅकेत जमा  करण्यात आले आहे.
               या लाभार्थ्यांनी आपले आधारकार्डची छायांकित प्रत,हयात नामा, मंजूरी आदेशाची प्रत बीड तहसील कार्यालयात अर्जासहित सादर करावेत. यानंतर लाभार्थ्यांचे आनुदान त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल. तसेच तहसील कार्यालय बीड येथे सर्व लाभार्थ्याची यादी नोटीस बोर्डवर डकविण्यात आली असल्याची तहसील कार्यालयातील पत्रात नमूद करण्यात आले आहे. लाभार्थ्यांनी संबधित तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा.******   
वृत्त्‍ क्रमांक:-144
                                                            अप्रेटीसशिप उमेदवारानी ऑनलाईन अर्ज सादर करावेत
               बीड,दि,3:- अप्रेटीसशिप झालेल्या उमेदवारांची शिकाउर् उमेदवारी 107 परीक्षा दि. 2 मे 2018 ते 11 मे 2018 या कालावधीत होणार असून परिक्षेचे वेळापत्रक तसेच कार्यक्रम पत्रिका www.apprenticeship.gov.in वर  news  & updates मये उपलब्ध असून परीक्षेला पात्र व नवीन व नापास उमेदवारांनी  www.apprenticeship.gov.in व  in cbtexam.dht.www  या संकेतस्थळावरुन माहिती घेउुन दि. 1 एप्रिल ते 10 एप्रिल 2018  पर्यत ऑनलाईन अर्ज सादर करावेत.
               उमेदवारांनी परीक्षा शुल्क मुलभूत पशिक्षण तथा अनुषांगिक सूचना केंद्राव्दारे औद्योगिक प्रशिक्षण संस्था बीड येथे जमा करावे. आक्टोंबर 17 ची 106 परीक्षेचा निकाल लागला असून शिकाऊ उमेदवारांनी मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र, औद्योगिक प्रशिक्षण संस्था बीड येथून प्राप्त करावे, असेमुलभुत प्रशिक्षण तथा अनुषांगिक सूचना केंद्राचे  अंशकालीन प्राचार्य यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.*******