बुधवार, २५ एप्रिल, २०१८


 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या मागण्यांची
                    संबधित अधिका-यांनी पुर्तता करुन अहवाल सादर करावेत
                                                     अपर जिल्हाधिकारी बी.एम.कांबळे

                     
       बीड,दि,025:- शेतकरी आत्महत्या बाबत अपर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी आत्महत्या बाबत जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या अपेक्षाचा आढावा घेतला व त्यांच्या मागणीनुसार त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला त्वरित लाभ मिळवून देण्यासाठी संबतिध अधिका-यांनी दोन दिवसात अहवाल सादर करण्याच्या सूचना श्री. कांबळे यांनी यावेळी दिल्या.
          बीड जिल्हयातील आत्महत्याग्रस्त शेतक-यांचा एकूण 14 प्रकरणाचा आढावा घेतांनी  अपर जिल्हाधिकारी बी.एम कांबळे यांनी आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुबियांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी शासनाकडून काय अपेक्षा आहेत असे विचारले. यावेळी 14 प्रकरणातील आत्महत्याग्रस्त प्रत्येक कुटुंबियातील व्यक्तींनी शासनाकडून विहीर,शेळया,म्हशी,मुलांच्या शिक्षणाचा खर्च,मुलांच्या औषधोपचारासाठी खर्च, त्यांच्या विधवा पत्नीला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ शासनाकडून मिळावा तसेच सुशिक्षीत मुलगा असेल तर त्याला शासकीय नोकरी मिळावी अशा अपेक्षा व्यक्त केल्या.
          या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी चद्रकांत सुर्यवंशी, प्रभारी जिल्हा पोलीस अधिक्षक अजित बोराडे,अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला,उपजिल्हाधिकारी रोहयो महेंद्र कांबळे, उपविभागीय अधिकारी  विकास माने,उपविभागीय अधिकारी, तहसीलदार,ग्रामसेवक,आत्महत्याग्रस्त शेतक-यांचे प्रतिनिधी जीवनराव बजगुडे,संबधित अधिकारी व आत्महत्याग्रस्त शेतक-यांचे विविध तालुक्याच्या गावातील कुंटुंबिय उपस्थित होते.******


       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा