सोमवार, १२ जून, २०१७

सांडपाण्यामुळे नद्या दुषित होणार नाहीत याची दक्षता घ्यावी - पर्यावरण मंत्री रामदास कदम


बीड, दि. 12 :-  बीड शहरासह जिल्ह्यातील घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन आदी कामांना प्राधान्य देऊन सांडपाणी नदीच्या पाण्यात मिसळून नद्या दुषित होणार  नाहीत याची संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी अशा सूचना राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केल्या.
बीड येथील शासकीय विश्रामगृह येथे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी बीड जिल्हा  पर्यावरण समितीच्या कामाचा आढावा घेतला यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ जालन्याचे उप प्रादेशिक अधिकारी श्री. शेळके यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना पर्यावरण मंत्री रामदास कदम म्हणाले की, पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छतेच्या दृष्टीने घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन अत्यंत महत्वाचे आहे. कचऱ्यावर प्रक्रीया करुन त्याचे खत तयार करावे. तसेच बीड शहर आणि ग्रामीण भागातीलही सांडपाणी व्यवस्थापनाला महत्व द्यावे. जेणे करुन सांडपाणी नद्यांच्या पाण्यामध्ये मिसळून पाणी दुषित होणार नाहीत.
यावेळी पर्यावरण मंत्री रामदास कदम म्हणाले की, ज्या प्लास्टीक उत्पादनांमुळे प्रदुषण होते नियमबाह्य प्लास्टीक उत्पादनांवर बंदी घालावी तसेच  अशा अशा प्रकारच्या उत्पादनांवर प्रशासनाने नियमितपणे नजर ठेऊन वेळोवेळी योग्य ती  कारवाई करावी.  जिल्हयातील वृक्षलागवड व वृक्षसंगोपन कार्यक्रमाचाही पर्यावरण मंत्र्यांनी यांनी सविस्तर आढावा घेऊन उपयुक्त सूचना केल्या. या बैठकीस संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

-*-*-*-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा