मंगळवार, १३ जून, २०१७

14 व 15 जून रोजी बीड येथे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रशिक्षणाचे आयोजन


बीड, दि. 13 :-  राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी बीड कोषागार कार्यालय तसेच नवी दिल्ली येथील भविष्य निर्वाह नियामक व विकास प्राधिकरण (PFRDA)  यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (NPS) प्रशिक्षण सत्राचे बुधवार, दिनांक 14 व 15 जून 2017 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृह, नगर रोड, बीड येथे चार सत्रामध्ये आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षणाची चार सत्रे पुढीलप्रमाणे आहेत. 
सत्र क्र. 1 दि. 14 जून 2017, सकाळी 10 ते दु. 1 दरम्यान मुख्यालय बीड  येथील डी.डी.ओ. (आहरण व संवितरण अधिकारी) क्र. 3301000131 ते डी.डी.ओ. क्र. 33010003444, सत्र क्र. 2 दि. 14 जून 2017 रोजी दुपारी 2 ते 5 वाजेदरम्यान मुख्यालय बीड येथील डी.डी.ओ. (आहरण व संवितरण अधिकारी) क्र.33010003958 ते डी.डी.ओ. क्र. 3301923421 तसेच गेवराई व वडवणी तालुक्यातील सर्व डी.डी.ओ.  यांचे प्रशिक्षण होईल.
सत्र क्र. 3 मध्ये दिनांक 15 जून 2017 रोजी सकाळी 10 ते 1 वाजेदरम्यान अंबाजोगाई, माजलगाव व धारुर तालुक्यातील सर्व डी.डी.ओ. (आहरण व संवितरण अधिकारी) यांचे प्रशिक्षण होईल. तर सत्र क्र. 4 मध्ये दिनांक 15 जून 2017 रोजी दुपारी 2 ते 5 वाजेदरम्यान आष्टी, केज, पाटोदा व शिरुर तालुक्यातील सर्व डी.डी.ओ (आहरण व संवितरण अधिकारी) यांचे प्रशिक्षण घेण्यात येईल.
जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी / कर्मचारी यांनी उपस्थित राहून या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन बीडचे जिल्हा कोषागार अधिकारी डी.डी. माडे यांनी केले आहे.

-*-*-*-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा