मंगळवार, ६ जून, २०१७

जीएसटी बाबत आवाहन 15 जूनपर्यंत व्यापाऱ्यांनी जीएसटीएनवर नोंदणी करावी


बीड, दि. 6 :- एक जुलैपासुन संपुण देशभर वस्तु आणि सेवा कर अंमलात येणार आहे. त्यासाठी मुल्यवर्धीत कायद्याअंतर्गत नोंदीत व्यापाऱ्यांनी www.mahavat.gov.in या संकेतस्थळावरुन प्रोव्हीजनल आयडी घेऊन GSTN  वर नोंदणी करणे आवश्यक आहे. यापुर्वी विक्रीकर विभागाने मुल्यवर्धीत कायद्याअंतर्गत नोंदीत व्यापाऱ्यांनी GSTN वर नोंदणी करावी यासाठी तालुकास्तरापर्यंत  बैठका घेऊन जनजागृती करण्यात आलेली आहे. तथापी काही नोंदीत व्यापाऱ्यांनी अद्यापही GSTN वर नोंदणी केली नाही. त्यामुळे अशा व्यापाऱ्यांना शेवटची संधी म्हणून दिनांक 1 ते 15 जून दरम्यान GSTN वर नोंदणी करण्यासाठी संधी उपलब्ध करुन दिलेली आहे.
अश व्यापाऱ्यांनी सर्व  प्रथम www.mahavat.gov.in  या संकेतस्थळावर जाऊन प्रोव्हीजनल आयडी घ्यावयाचा आहे. त्यासाठी व्यापाऱ्यांना स्वत:चा मोबाईल क्रमांक, इ-मेल आयडी इत्यादी माहितीची आवश्यकता आहे. प्रोव्हीजनल आयडी घेतल्यानंतर व्यापाऱ्याने www.gst.gov.in  या संकेतस्थळावर जाऊन सर्वप्रथम पासवर्ड बदलून घेणे आवश्यक  आहे. त्यानंतर नोंदणीची प्रक्रीया पुर्ण करणे गरजेचे आहे. तसेच नोंदणी करतानाच Digital Signature Certificate (DSC) किंवा E-sign ची नोंदणी करणे आवश्क आहे. या प्रक्रियेसंबंधी माहिती विभागाच्या संकेतस्थळावरील 35 T2016  या परिपत्रकात विभागाच्या संकेतस्थळावरील www.mahavat.gov.in या संकेतस्थळावरील whats new section मधील FAQ  मध्ये तसेच www.gst.gov.in या संकेतस्थळरावरील user manual मध्ये विषद करण्यात आलेली आहे. व्यापाऱ्यास नोंदणी करतेवेळी कोणतीही अडचण आल्यास त्यांनी संबंधित Nodal Officer कडे तात्काळ संपर्क साधावा. व्यापाऱ्यांनी सदरची प्रक्रीया 15 जून 2017 पर्यंत पूर्ण न केल्यास त्यांचे व्हॅट (मुल्यवर्धीत  कर)  मधून GST मध्ये संक्रमण होणार नाही त्या सदरील व्यापारी संक्रमणामुळे मिळणाऱ्या फायद्यास  अनुज्ञेय राहणा नाहीत असे औरंगाबाद विभागाच्या विक्रीकर सहआयुक्त (व्हॅट प्रशासन) दिपा मुधोळ-मुंडे यांनी कळविले आहे.

-*-*-*-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा