बीड,
दि. 8 :- राज्याचे जलसंधारण
व राजशिष्टाचार मंत्री प्रा.राम शिंदे हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा
दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार
दि.10 मे 2017 रोजी सकाळी 6.25 वाजता औरंगाबाद विमानतळ येथे आगमन व शासकीय मोटारीने
बीड जिल्ह्याकडे प्रयाण. सकाळी 8 वाजता गेवराई
तालुक्यातील ढोकवडगांव व बीड तालुक्यातील लोळसगांव येथील जलयुक्त शिवार/ जलसंधारण कामांची
तसेच जिल्ह्यातील इतर काही कामांची प्रत्यक्ष पाहणी त्याचप्रमाणे गाळमुक्त धरण व गाळयुक्त
शिवार योजनेचा शुभारंभ. दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह, बीड येथे राखीव.
दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे 2015-16, 2016-17, 2017-18 मधील बीड
जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेंतर्गत समावेश असलेल्या गावांतील कामांचा आढावा त्याचप्रमाणे
जलसंधारण विभागामार्फत करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा. दुपारी 4.30 वाजता पत्रकार परिषद (स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय,बीड). सायंकाळी
सोईनूसार शासकीय मोटारीने गेवराई जि.बीडकडे प्रयाण. शासकीय विश्रामगृह गेवराई येथे
आगमन व मुक्काम.
गुरुवार
दि.11 मे 2017 रोजी सकाळी 7 वाजता शासकीय मोटारीने अंबड तालुका जि.जालनाकडे प्रयाण
करतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा