बुधवार, ८ मार्च, २०१७

बीड जिल्हा पोलीस भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज करावेत




               बीड, दि.8 :- महाराष्ट्र राज्यासह बीड जिल्ह्यात पोलीस भरती प्रक्रीया चालू असून ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रीया दि.24 फेब्रुवारी ते 17 मार्च 2017 कालावधीत होत आहे. दि.20 मार्च पासून पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर प्रत्यक्ष शारिरीक चाचणी, लेखी परीक्षा होणार आहे. तसेच या तारखेमध्ये उन्हाच्या तिव्रतेमुळे कोणताही बदल होणार नाही. जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुण, तरुणींनी पोलीस भरती प्रक्रीयेमध्ये सक्रीय सहभागी होऊन पोलीस प्रशासनात दाखल व्हावे. भरती पारदर्शक होणार असल्याने उमेदवारांनी कोणाच्या अमिषाला बळी पडू नये व तसे निदर्शनास आल्यास तात्काळ पोलीस अधिक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधिक्षक वैभम कलुमर्बे आणि पोलीस उपअधिक्षक (गृह) अंजुम शेख यांच्याशी 02442-222333, 225124 किंवा dysphq.beed@mahapolice.gov.in वर संपर्क साधावा. असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. असे पोलीस अधिक्षक, बीड यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा