बीड, दि.8 :- बीड शहर भूमापन कामातील अनियमितता दुर करण्याच्या
दृष्टीने व सरकारी जागेवरील अतिक्रमणे शोधण्याच्या दृष्टीने बामणवाडी ते मंन्सुरशाह
दर्गा परिसरातील सरकारी ओढ्यात करण्यात आलेल्या बांधकामाची उप अधिक्षक भूमि अभिलेख
कार्यालयामार्फत दि.15 ते 17 मार्च 2017 कालावधीत मोजणी काम करण्यात येणार आहे. तरी
सर्व संबंधितांनी आपआपल्या मिळकतीच्या ठिकाणी मालकी हक्काच्या पुराव्यासह जसे खरेदी
खत, आपल्या जागेचा ले आऊट नकाशा इत्यादी कागदपत्रासह हजर राहून मोजणीदारास सहकार्य
करावे असे भूमि अभिलेख कार्यालयाचे उप अधीक्षक नारायण काळे यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा