बीड,
दि. 4 :- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बीड तथा क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र
राज्य, पुणे यांच्यामार्फत जिल्ह्यात सन 2008-2009 व 2009-2010 मध्ये अनुदान वितरीत
करण्यात आलेल्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी, ग्रामविकास अधिकाऱ्यांनी प्राप्त
अनुदान, खर्च, विनियोग प्रमाणपत्र, ग्रामपंचायत बँकेचे स्टेटमेंट, पासबुकाची छायाकित
प्रत व लेखा परिक्षकांच्या स्वाक्षरीचे विनियोग प्रमाणपत्र दि.5 जानेवारी 2017 पर्यंत
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,बीड येथे सादर करावेत.
ग्रामीण
भागात खेळाच्या पायाभूत सुविधा निर्माण होवून त्यापासून उत्कृष्ट खेळाडू तयार होण्याच्या
उद्देशाने केंद्र शासन व राज्य शासनामार्फत सन 2008-2009 या वर्षापासून पंचायत युवा
क्रीडा व खेल अभियान ही योजना राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत 103 ग्रामपंचायती
व एक तालुका आणि सन 2009-2010 या वर्षात 90 ग्रामपंचायती व एक तालुका निवडण्यात येवून
क्रीडांगण तयार करण्याकरीता 1 लाख रुपये व तालुक्यांना 5 लाख रुपयाचे अनुदान देण्यात आले आहे. तरी महालेखाकार
(लेखापरिक्षा), नागपूर यांच्यामार्फत या योजनेचे परफॉरम्स लेखा परिक्षण होणार असून त्यांचा विषय मॅनेजमेंट ऑफ स्पोर्टस
इन्फ्रास्ट्रक्चर इन महाराष्ट्र स्टेट असा असून यामध्ये पंचायत युवा क्रीडा व खेल या
योजनेचा प्रगती अहवाल तपासण्यात येणार आहे. असे बीडचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी
कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा