बुधवार, २१ डिसेंबर, २०१६

पालवन येथे रेल्वे मार्गासाठी जमीन संपादन जमीन मालकांनी पुराव्यासह हजर रहावे




            बीड, दि.21 :- अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वे मार्गासाठी संपादीत झालेल्या, होणाऱ्या पालवन येथील गट नंबर 131,132, 119,120, 109,110, 135,136, 106,107, 107,108, 61,62, 96,97, 116,117, 117,118, 40,41, 98,99, 102,103, 113,114, 114,115, 143,144, 124,125 आणि 130,131 मधील ज्यांची जमीन रेल्वे मार्गासाठी संपादीत झालेली आहे किंवा होत आहे. अशा सर्व धारकांनी उपविभागीय अधिकारी, बीड यांच्याकडून भूमि अभिलेख कार्यालयास प्राप्त संपादीत होणाऱ्या जमिनीबाबतच्या अनेक तक्रारी, आक्षेप अर्जाची खात्री, पडताळणी करण्याच्या कामासाठी भूमि अभिलेख कार्यालयाचे भूमापक पी.ई. चव्हाण हे दि.27 व 28 डिसेंबर 2016 रोजी मौजे पालवन येथे प्रत्यक्ष जागेवर येणार आहेत. तरी ज्यांची जमीन संपादीत झालेली आहे अथवा होत आहे अशा सर्व धारकांनी तसेच तक्रारदारांनी सकाळी 10 वाजेपासून ते काम संपेपर्यंत आपल्या गटात संपादीत जागेवर मालकी हक्काच्या पुराव्यासह हजर रहावे व भूमापक यांना चौकशी कामी सहकार्य करावे. असे बीडचे उपअधिक्षक भूमि अभिलेख यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा