बीड, दि.21 :- जिल्हा विधी सेवा
प्राधिकरण बीड व जिल्हा वकील संघ बीड यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि.22
डिसेंबर 2016 रोजी सायंकाळी 6.30 वाजता बीड तालुक्यातील ताडसोन्ना येथे राष्ट्रीय
विधीसेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या सुचनेनूसार गरिबांसाठी असलेल्या 7 विविध
शासकीय योजनांची (नालसा स्कीम) माहिती देण्यासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश
बीड, जिल्हाधिकारी बीड व जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि बीड
मुख्यालयातील इतर न्यायिक अधिकारी, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड मंगेश पोकळे व
इतर पदाधिकारी, जिल्हा सरकारी वकील ॲड.ए.डी.राख, गटविकास अधिकारी यांचीही उपस्थिती
शिबीरासाठी लाभणार असून ताडसोन्ना परिसरातील सर्व नागरिकांनी शिबीरास मोठ्या
संख्येने उपस्थितीत राहून शासनाच्या विविध योजनाची माहिती व कार्यक्रमाचा लाभ
घ्यावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा जिल्हा वकील संघ, बीड यांनी केले
आहे. असे जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे अधिक्षक यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा