गुरुवार, २२ डिसेंबर, २०१६

न्युक्लिअस बजेट योजनेअंतर्गत विविध प्रशिक्षणासाठी नामांकित संस्थानी प्रस्ताव सादर करावेत




            बीड, दि.22 :- औरंगाबाद एकात्मिक आदिवासी प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील औरंगाबाद, जालना, परतूर, लातूर, बीड या जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या युवक, युवतींना न्युक्लिअस बजेट योजनेअंतर्गत सन 2016-17 या वित्तीय वर्षात नामवंत संस्थाकडून विविध योजनांचे प्रशिक्षण द्यावयाचे असल्याने नामांकित संस्थानी प्रस्ताव सादर करावेत.
प्रस्तावासाठीचा अर्जाचा नमूना कार्यालयीन वेळेत मिळेल. प्रस्ताव दोन प्रतिसह कार्यालयात शासकीय सुट्टी सोडून दि.26 डिसेंबर 2016 पर्यंत दाखल करणे आवश्यक आहे. प्रत्येक प्रशिक्षणासाठी स्वतंत्र प्रस्ताव सादर करावा लागेल. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या प्रस्तावाचा विचार केला जाणार नाही. जे प्रशिक्षण शासनमान्य आहे तसेच ज्या प्रशिक्षणासाठी संस्था प्रस्ताव सादर करणार आहेत. त्या प्रशिक्षणाची नोंद संस्थेच्या घटनेच्या उद्दिष्टांमध्ये असणे आवश्यक आहे. असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प औरंगाबादचे प्रकल्प अधिकारी यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा