बीड, दि.22 :- पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी आकाशवाणीच्या माध्यमातून जनतेशी साधलेला संवाद मन की बात या कार्यक्रमाचा
सत्तावीसवा भाग रविवार दि.25 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 11 वाजता प्रसारित होणार असून
त्यानंतर लगेच कार्यक्रमाचा मराठी अनुवाद प्रसारीत करण्यात येईल. तसेच रात्री 8 वाजता
मराठी अनुवाद पुन: प्रसारीत करण्यात येणार आहे. कार्यक्रम आकाशवाणी बीड अर्थात एफएम
बँडच्या 102 पुर्णांक 9 दशांश मेगाहर्टसवरुन सर्व श्रोत्यांना ऐकता येईल. श्रोत्यांनी
आपल्या प्रतिक्रीया airmannkibaat@gmail.com या संकेतस्थळावर पाठवावी. असे आकाशवाणीचे
कार्यक्रम अधिकारी यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा