बीड, दि.22 :- राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये माहे जानेवारी ते
मे 2017 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतीच्या
सार्वत्रिक निवडणूकांचा 1 ते 8 टप्प्यातील निवडणूक कार्यक्रम जाहिर केला असून आदर्श
आचार संहिता अंमलात आलेली आहे. कार्यक्रमाच्या अनुषंगाने अंबाजोगाई तालुक्यातील मोरेवाडी
ग्रामपंचायतीसाठी बुधवार दि.28 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 7.30 ते 5.30 वाजेपर्यंत मतदान
होत असून मतदान समाप्तीनंतर मतमोजणी ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसीलदार
निश्चित करतील त्यानूसार राहील. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम-1959 मधील नियम-37 नूसार
ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचा गुरुवार दि.29 डिसेंबर निकाल प्रसिध्द करण्याचा अंतिम
दिनांक आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवू नये आणि निवडणूका व मतमोजणी खुल्या
वातावरणात पार पाडाव्यात या दृष्टीने योग्य ती नियमाधीन कार्यवाही अनुसरण्यात यावी.
असे जिल्हाधिकारी, बीड यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा