बीड, दि.
5 :- बीड जिल्हा परिषदेतील पशुसंवर्धन विभागामार्फत
विशेष घटक योजना सन 2016-17 या वर्षाकरीता 75 टक्के अनुदानावर दुभत्या जनावरांचे गट वाटप व 75 टक्के
अनुदानावर शेळी गट वाटप करण्यासाठी पात्र लाभार्थींची निवड संगणक प्रणालीद्वारे सोडत
पध्दतीने शुक्रवार दि.9 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 11 वाजता बीड बसस्थानकासमोरील स्काऊट
गाईड भवनामध्ये होणार आहे.
सोडतीस
जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडीत, जिल्हा परिषद उपाध्यक्षा तथा पशुसंवर्धन विभागाच्या
सभापती आशाताई दौंड यांच्यासह जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व सदस्य हे उपस्थित राहणार
आहेत. शेळी गटासाठी एकुण 205 लाभार्थ्यांची निवड करावयाची आहे. लाभधारकांची सोडत जिल्हा
परिषद गटनिहाय दुभत्या जनावरांचे एकुण 39 लाभार्थी निवड करावयाचे असून त्यांची सोडत
तालुकानिहाय होणार आहे.
जिल्ह्यातील
पात्र लाभार्थ्यांनी सोडतीकरीता उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा
तथा पशुसंवर्धन समिती सभापती आशाताई दौंड यांनी केले आहे. असे बीड जिल्हा परिषदेचे
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा