बीड, दि.
6 :- बीड शहर नगर भूमापन कामातील अनियमीतता दुर करण्यासाठी दि.14 ऑक्टोबर 2016 रोजीच्या
कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने बीड नगर भूमापन हद्दीतील सर्व्हे नंबर
32 व 33 गिराम मधील मिळकतीची सविस्तर मोजणी गुरुवार दि.8 डिसेंबर 2016 रोजी सकाळी
9.30 वाजेपासून करण्यात येणार आहे.
तरी संबंधितांनी
8 डिसेंबर रोजी मिळकतीचे मालकी हक्क सिध्द करणारे सर्व कागदपत्रे, पुरावे घेऊन नियोजित
दिनांकास आपल्या मिळकतीच्या ठिकाणी न चुकता हजर रहावे. आपण हजर न राहिल्यास आपल्या
अनुपस्थितीत मोजणीची कार्यवाही पुर्ण करण्यात येईल व कोणतेही म्हणणे, आक्षेपाची दखल
घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी. असे बीडचे उप अधिक्षक भूमि अभिलेख नारायण काळे
यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा