बुधवार, १४ डिसेंबर, २०१६

जिल्ह्यातील लघु उद्योग घटकांनी पुरस्कारासाठी अर्ज सादर करावेत


            बीड, दि. 14 :- जिल्हा पातळीवर लघु क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लघु उद्योग घटकांना सन 2016 च्या जिल्हा पातळीवरील प्रथम व द्वितीय जिल्हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी जिल्ह्यातील पात्र लघु उद्योग घटकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. निवड झालेल्या घटकास स्मृती चिन्ह व प्रथम पुरस्कारासाठी 15 हजार रुपये, द्वितीय पुरस्कारासाठी 10 हजार रुपये रोख रक्कम उत्तेजनार्थ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

            अटी व शर्ती याप्रमाणे उद्योग घटक मागील दोन वर्षापासून नियमित उत्पादनात असणे आवश्यक आहे, लघु उद्योग घटकाने पाच वर्षापूर्वी स्थायी लघु उद्योग नोंदणी केलेली असावी, मागील दोन वर्षामध्ये घटकास सातत्याने नफा झालेला असावा व रोजगार निर्मितीमध्ये वाढ होणे अपेक्षीत आहे, कोणत्याही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा, लघु उद्योग घटकास यापूर्वी कोणताही राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला नसावा, उत्पादनासाठी नविन तंत्रज्ञान अंवलंबिलेल्या घटकास प्राधान्य राहिल अटीची पुर्तता करणाऱ्या लघु घटकांनी महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, बीड यांच्याकडे विहीत नमुन्यातील अर्ज शुक्रवार दि.23 डिसेंबर 2016 पर्यंत सादर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र, बशिरगंज, बीड दुरध्वनी क्र.02442-222285 व ई-मेल didicbeed@maharashtra.gov.in यावर संपर्क करावा. असे बीड जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा