बीड, दि. 14 :-जानेवारी ते मे 2017 या कालावधीत मुदत संपणाऱ्या
तसेच नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक
निवडणूकांची निवडणूक कार्यक्रमानूसार बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक
बुधवार दि.28 डिसेंबर 2016 रोजी मतदान होणार आहे. अंबाजोगाई तालुक्यातील ग्रामपंचायत
मोरेवाडी ग्रामीण क्षेत्रातील ग्रामपंचायत मधील प्रभागातील क्षेत्रात मतदारांना मतदानाचा
हक्क बजावता यावा याकरीता बुधवार दि.28 डिसेंबर रोजी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात
आली आहे.
सर्व आस्थापना
व बँक (ज्यांना जिल्हाधिकारी यांनी दिलेली स्थानिक सुट्टी लागू होत नाही) त्यांच्या
आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी यांना मतदान करता यावे याकरीता कामाच्या तासामधून दोन
तासाची सवलत देण्यात आली आहे. असे बीडचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा