शनिवार, ३ डिसेंबर, २०१६

जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली संपन्न


                                                              
          बीड, दि. 3 :- बीड जिल्हा रुग्णालयातील जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, नेहरु युवा केंद्र, बीड व वासनवाडी येथील राजर्षि शाहु महाराज प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विद्यमाने 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली काढण्यात आली.

            रॅलीचे उदघाटन अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश स.रा. कदम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव श्री.भोसले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागेश चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदिप सांगळे, डॉ.संजय पाटील, डॉ.एच.एस.मोगले, डॉ.आय.व्ही.शिंदे, डॉ.जयश्री बांगर, डॉ.हनुमंत पारखे, साधना गंगावणे, तत्वशिल कांबळे आदि मान्यवरांनी केले. यावेळी नेहरु युवा केंद्राचे नाना गव्हाणे, अमोल जगताप, अश्विनी गाडे, लखन घुगे, अशोक गव्हाणे, शरद पोकळे आदिंची उपस्थिती होती. या रॅलीमधून शहरात फलकाद्वारे व घोषणांनी एड्स विषयी जनजागृती करण्यात आली आणि एड्सने संक्रमीत व्यक्तीने स्वत:ची कशी काळजी घ्यावी याविषयीची माहिती देण्यात आली. असे नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा