शनिवार, ३ डिसेंबर, २०१६

उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशोब 27 डिसेंबर पर्यंत सादर करावा


                  

          बीड, दि. 3 :- बीड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2016 साठी निवडणूक लढविलेल्या सर्व उमेदवारांनी महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 16 चे पोटकलम (1 ड) नूसार निवडणूक निकालापासून एक महिन्याच्या मुदतीत म्हणजे 27 डिसेंबर 2016 पर्यंत निवडणूक खर्चाचा हिशोब विहीत नमुन्यात व विहीत शपथपत्रासह सादर करणे आवश्यक आहे. मुदतीत खर्चाचा हिशोब सादर न केल्यास महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 16 चे पोटकलम (1 ड) मधील नियमास अनुसरुन 3 वर्षाकरीता अनर्ह ठरविण्याची तरतुद असून राज्य निवडणूक आयुक्त, मुंबई यांच्या आदेशान्वये जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत केले आहे. तरी आपण निवडणूक खर्च वरील मुदतीत सादर करावा अन्यथा उमेदवारांविरुध्द अनर्हतेची कार्यवाही प्रस्तावित केली जाईल याची नोंद घ्यावी. असे बीड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2016 चे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा