बीड, दि.
7 :- जिल्हा रुग्णालयातील जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागामार्फत एड्स सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेनबत्ती
रॅलीस जिल्हा परिषदेचे सभापती संदीप क्षीरसागर व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश चव्हाण
यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. यावेळी समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त रविंद्र
शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. ज्ञानोबा मोकाटे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय
पाटील, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.कमलाकर आंधळे, तत्वशिल कांबळे, क्षयरोग अधिकारी डॉ.निपटे,
वैद्यकीय अधिकारी डॉ.आय.जी. शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मेनबत्ती
रॅलीस छत्रपती शिवाजी महाराज चौकातून प्रांरभ झाला या रॅलीमध्ये हातात मेनबत्ती घेऊन
महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थीनी, पत्रकार, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. या
रॅलीत ''होऊनी सारे एकसंघ, करुया एचआयव्हीचा प्रतिबंध'' आदि घोषणा देण्यात आल्या. प्रत्येकांच्या
हातातील मेनबत्ती शहरवासीयांचे लक्ष वेधून घेत होती. रॅलीच्या माध्यमातून एड्सने मृत्यू
पावलेल्या रुग्णांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. ही रॅली शिवाजी चौकापासून सुरु
होऊन बशिरगंज, सुभाष रोड - अण्णाभाऊ साठे चौक, बसस्टॅड मार्गे शिवाजी चौक येथून जिल्हा
रुग्णालयात दाखल होऊन रॅलीचा समारोप करण्यात आला. मेनबत्ती रॅली यशस्वी करण्यासाठी
जिल्हा रुग्णालयातील कार्यक्रम अधिकारी श्रीमती साधना गंगावणे, पर्यवेक्षक सुहास कुलकर्णी
यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आदिनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा