गुरुवार, ८ डिसेंबर, २०१६

पदवीधर अंशकालीन उमेदवारांना रोजगार विभागाची सुचना


         

          बीड, दि. 8 :- बीड जिल्ह्यातील 778 पदवीधर अंशकालीन उमेदवारांची यादी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बीड या कार्यालयाने उपसंचालक, कौशल्य विकास व उद्योजकता विभागीय मुख्यालय, औरंगाबाद यांना पाठविली आहे. अशा उमेदवारांनी पुन्हा संपर्क साधण्याची आवश्यकता नाही. यादी पाठविल्यानंतर ज्या उमेदवारांचा यादीमध्ये समावेश झालेला नाही अशा उमेदवारांनी दि.12/01/2017 पर्यंत या कार्यालयामध्ये स्वखर्चाने सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत स्वत: संपर्क साधुन आपली कागदपत्रे सादर करावीत. यानंतर आलेल्या उमेदवारांचा यादीमध्ये समावेश केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. असे सहायक संचालक, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बीड यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा