शुक्रवार, १६ डिसेंबर, २०१६

जिल्हा परिषद गटनिहाय मतदार यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर




            बीड, दि. 16 :- राज्य निवडणूक आयोग यांनी दि.22 नोव्हेंबर 2016 रोजीच्या आदेशात नमुद केल्याप्रमाणे राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची मुदत माहे मार्च 2017 मध्ये संपत असल्याने त्यापुर्वी फेब्रुवारी 2017 मध्ये सर्व निवडणूका घ्याव्या लागणार आहेत. यासाठी भारत निवडणूक आयोकाकडून दि.5 जानेवारी 2017 हा अर्हता दिनांक लक्षात घेवून तयार केली जाणारी मतदार यादी या निवडणूकांसाठी वापरली जाणार आहे. यासाठी राज्य निवडणूक आयोगातर्फे जिल्हा परिषद व पंचायत समित्या निवडणूकीसाठी भारत निवडणूक आयोगाचे दि.19 सप्टेंबर 2016 रोजीच्या मतदार यादीचे जिल्हा परिषद गटनिहाय विभाजन करुन बीड  जिल्हाधिकारी कार्यालयांच्या www.beednic.in या संकेतस्थळावर नागरिकांच्या माहितीस्तव ठेवण्यात आली आहे. असे जिल्हाधिकारी, बीड यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा