बीड, दि. 16 :- एचआयव्हीग्रस्त टीबी रुग्णांना टीबी औषधीकरीता
पुर्वी टीबी कार्यालयात जाऊन औषधोपचार घ्यावा लागत असे परंतू आता जिल्हा क्षयरोग विभागामार्फत
99 डॉट्स ही टीबी रुग्णांची औषधी आता एआरटी सेंटरमध्येच एआरटी व टीबी औषधी उपलब्ध झाली
आहे. मंगळवार दि.13 डिसेंबर 2016 रोजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागेश चव्हाण यांच्या
हस्ते 99 डॉट्स ही टीबी औषधी रुग्णांना देऊन शुभारंभ करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई अंतर्गत
जिल्ह्यामध्ये एचआयव्ही संसर्गीत रुग्णांसाठी एआरटी सेंटर या स्वतंत्र विभागाची सोय
जिल्हा रुग्णालयामध्ये करण्यात आली असून दि.4 सप्टेंबर 2016 रोजी एआरटी सेंटरचे उदघाटन
झाले आहे. यावेळी जिल्हा रुग्णालयातील त्वचारोग तज्ञ डॉ.आय.व्ही.शिंदे, वरिष्ट वैद्यकीय
अधिकारी डॉ.कोकणे, वैद्यकीय अधिकारी डॉ.लहाने, श्री.नाईकनवरे, श्री.डोलारे, श्री.मामडगे
व एआरटीमधील सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. असे जिल्हा शल्य चिकित्सक
यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा