बीड,
दि. 14 :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत
बीड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित राज्यस्तरीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धेला
ऊत्साहाच्या वातावरणात गुरुवार दि. 15 डिसेंबर 2016 रोजी बीड येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर सुरुवात
झाली. मार्गदर्शन करतांना निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी स्पर्धकांना
स्पर्धेत जिंकणाच्या इर्शेने खेळा व खेळाडू वृत्तीने जय, पराजय स्विकारा असा संदेश
दिला.
जिल्हा
क्रीडा संकुलाच्या मैदानावर दि. 15 ते 17 डिसेंबर 2016 दरम्यान तीन दिवस राज्यस्तरीय
शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धा घेण्यात येत आहेत.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय
तथा जिल्हा क्रीडा परिषद बीड व बीड जिल्हा बेसबॉल असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने
राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, पोलीस उपअधिक्षक गणेश गावडे, क्रीडा
उपसंचालक राजकुमार माहादावाड, जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे, क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे (औरंगाबाद), बेसबॉल संघटनेचे राज्य
कोषाध्यक्ष अशोक सरोदे, राजेंद्र बनसोडे, अजय देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचा
उदघाटन समारंभ पार पडला.
या
कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी केले तर आभार क्रीडा
अधिकारी सुहासिनी देशमुख यांनी मानले. आंतरराष्ट्रीय खेळाडू कु. गिरीजा बोडेकर (कोल्हापुर)
यांच्या हस्ते क्रीडा ज्योत मैदानात आणण्यात आली. क्रीडा खात्याचा ध्वज फडकवून व मेजर
ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. क्रीडा मार्गदर्शक अजय पवार, डी. के. चांदवडे यांच्यासह
प्रा. दिनकर थोरात, प्रा. राजेंद्र बरकसे, भागवत वराट, अविनाश बारगजे, सुनिल गव्हाणे,
अरुण शेप, दादासाहेब बडे, प्रभाकर घोडके, पंढरीनाथ क्षीरसागर यांची उपस्थितीत होती.
यावेळी आंतरराष्ट्रीय खेळाडू गिरीजा बोडेकर यांनी सर्व खेळाडूंना शपथ दिली. निवड समिती सदस्य अनिल साहु, राष्ट्रीय खेळाडू श्रीनिवास
सानप, कु. मोनाली पुजारी, के. जे. शेख, विजय मुंडे यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते
सत्कार करण्यात आला.
तीन
दिवस चालणाऱ्या राज्यस्तरीय शालेय बेसबॉल स्पर्धेस 14 वर्षाखालील वयोगटातील महाराष्ट्रातील
जवळपास 300 खेळाडू सहभागी झाले आहेत. दिल्ली
येथे दि. 02 ते 08 जानेवारी 2017 या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेसाठी
महाराष्ट्र राज्याचे संघ याच ठिकाणी निवडले जाणार आहेत. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या
मार्गदर्शनाखाली क्रीडा अधिकारी, क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा संघटक, जिल्हा बेसबॉल संघटनेचे
गोरख कैवाडे, रेवनाथ शेलार, किशोर काळे, सर्व पदाधिकारी शेख अजिज, फय्युम शेख, सोमनाथ राऊत, ताज पठाण, आशफाक पठाण, सुनिल ससाने, शेख रशिद यांच्यासह खेळाडू
स्पर्धा यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत. असे बीडचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले
आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा