बीड, दि. 13 :- भारत निवडणूक आयोगाकडून दि.1 नोव्हेंबर
2016 या अर्हता दिनांकावर आधारीत शिक्षण मतदारसंघाच्या मतदार याद्याचे पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत
दावे व हरकती स्विकारण्याची या पूर्वीच्या दि.23 नोव्हेंबर 2016 ते 8 डिसेंबर 2016
हा कालावधी भारत निवडणूक आयोगाने वाढवून दिला आहे. आता सदर कालावधी दि.23 नोव्हेंबर
2016 ते 19 डिसेंबर 2016 असा करण्यात आला आहे. या कार्यक्रमामध्ये पात्र शिक्षकांनी
तहसिल कार्यालयामध्ये दावे व हरकती दाखल कराव्यात अशी सुचना जिल्हा निवडणूक निर्णय
अधिकारी, बीड यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा