बीड, दि. 20 :- दरवर्षी राष्ट्रीय ग्राहक दिन 24 डिसेंबर
रोजी साजरा केला जातो मात्र बीड जिल्ह्यात राष्ट्रीय ग्राहक दिन दि.26 डिसेंबर
2016 रोजी साजरा करण्यात येत असून Alternative Dispute Resolution for redressal
of consumer disputes हा विषय निश्चित केला असून या विषयाच्या अनुषंगाने राष्ट्रीय
ग्राहक दिनानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शन, शिबीरे, परिसंवाद, चर्चासत्रे,
कार्यशाळा, ग्राहक संरक्षण विषयक निबंध, चित्रकला, वक्तृत्व, वादविवाद स्पर्धा, प्रबोधनपर
कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हास्तरावरील
कार्यक्रम दि.26 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात
सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व ग्राहक
चळवळीशी संबंधित व्यक्ती, ग्राहक संघटना, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवरील सर्व शासकीय
व अशासकीय सदस्य व जिल्ह्यातील सर्व ग्राहक यांना जिल्हाधिकारी यांच्यावतीने जागतिक
ग्राहक दिनानिमित्त निमंत्रित करण्यात आले आहे. असे बीडचे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी
कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा