मंगळवार, २० डिसेंबर, २०१६

आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर योजनेच्या लाभासाठी अर्ज करावेत


           
            बीड, दि. 20 :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर योजना राबविण्यात येत असून योजनेअंतर्गत शासननिर्णयानूसार पात्र दाम्पत्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते. आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर योजना जिल्हास्तरावर जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्यामार्फत राबविण्यात येत असून या योजनेचा लाभ मिळण्यासाठी विहीत नमुन्यातील भरलेला अर्ज सहाय्यक गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे सादर करावेत.

            आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर योजना अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग व्यक्तीपैकी एक व्यक्ती व दुसरी व्यक्ती सवर्ण हिंदू, लिंगायत, जैन, शिख यांच्यातील असेल तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग या आंतरप्रवर्गामधील आंतरजातीय विवाहीतांसाठी लागू आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, बीड यांच्याकडे संपर्क साधावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा