शुक्रवार, ९ डिसेंबर, २०१६

22 डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन


         
          बीड, दि. 9 :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय बीड यांच्यामार्फत जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे गुरुवार दि.22 डिसेंबर 2016 या कालावधीत सकाळी 11 वाजता गेवराई येथील र.भ.अट्टल महाविद्यालयातील गोदावरी सभागृहात आयोजन करण्यात आले आहे.
            युवा महोत्सवात 13 ते 35 वयोगटातील युवक-युवती सहभागी होऊ शकतात. युवा महोत्सवात लोकनृत्य, लोकगीत, एकांकीका, शास्त्रीय गायन(हिंदुस्थानी किंवा कर्नाटकी), शास्त्रीय वाद्य-सितार, मृदंग, हार्मोनियम, गिटार, शास्त्रीय नृत्य-मणिपूरी, ओडीसी, भरतनाट्यम, कथ्थक, कुचपुडी, वक्तृत्व (हिंदी व इंग्रजी) या कला सादर करण्यात येतील. 22 डिसेंबर रोजी जिल्हा युवा महोत्सवाचे उदघाटन झाल्यानंतर शास्त्रीय वादन, शास्त्रीयनृत्य, शास्त्रीय गायन, लोकगीत, लोकनृत्य, एकांकीका या कला प्रकारातील स्पर्धा नियोजनाप्रमाणे होतील.  

            बीड जिल्ह्यातील युवक, युवती, युवक मंडळे, नाट्यमंडळे, विद्यालये, उच्च माध्यमिक विद्यालयांनी कलाकारांना, संघानी त्याचा प्रवेश अर्ज जन्म तारखेच्या दाखल्यासह दि.20 डिसेंबर 2016 पर्यंत क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल इमारत, बीड येथे सादर करावीत. अधिक माहितीकरीता क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर (मो.9422243435) व र.भ.अट्टल महाविद्यालयाचे प्रा.राजेंद्र बरकसे (मो.8421683467) यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. व जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी युवा महोत्सवात सहभाग घ्यावा. असे बीडचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा