बीड,
दि. 9:- जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी
म्हणून जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,बीड व ग्लोबल रीच
स्किल ट्रेनिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबाद, शिवनेरी बहुउद्देशिय सेवाभावी
संस्था नेकनूर, ग्लोबल कॉम्प्युटर एज्युकेशन बीड यांच्या संयुक्त विद्यमाने 14 व
16 डिसेंबर 2016 रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार दि.14 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते
4 पर्यंत अंबाजोगाई येथील मेसर्स टेक्नोपार्क येथे तर शुक्रवार दि.16 डिसेंबर रोजी
सकाळी 10 ते 4 पर्यंत बीड तालुक्यातील नेकनूर येथील कालीका मंदिर प्रतिष्ठाण या ठिकाणी
रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्याच्या दिवशी पुणे, औरंगाबाद व बीड जिल्ह्यातील
नामांकीत उद्योजक उपस्थित राहून उमेदवारांना मुलाखतीद्वारे निवड करणार आहेत. तरी जिल्ह्यातील
बेरोजगारांनी मुळ कागदपत्रे व ऑनलाईन पाससह हजर रहावे. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,
रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक वि.जा. मुकणे यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा