शुक्रवार, ९ डिसेंबर, २०१६

मॉड्युलर शस्त्रक्रियागृह व नवजात बालकांसाठी विशेष कक्षाचे 10 डिसेंबर रोजी लोकार्पण



            बीड, दि. 9:- जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र.211 वर होणाऱ्या अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना मोठ्या शस्त्रक्रिया करण्यासाठी वरिष्ठ रुग्णालयाकडे संदर्भित करावे लागत असल्याने ही गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा रुग्णालयाने जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2015-16 च्या नाविन्य पूर्ण योजनेअंतर्गत मॉड्यूलर आर्थोपेडिक शस्त्रक्रीयागृहाबाबतचा प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावास खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केलेल्या विशेष प्रयत्नामुळे प्रस्तावास जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय मान्यता देवून 84.85 लाख रुपये किंमतीच्या मॉड्युलर शस्त्रक्रियागृहाच्या कामास अनुदान उपलब्ध करुन दिले. या कामाचे लोकार्पण दि.10 डिसेंबर 2016 रोजी दुपारी 12.15 वाजता जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात करण्यात येणार आहे. तसेच नवजात बालकांसाठी जिल्हा रुग्णालयात स्थापन केलेल्या एस.एन.सी.यु. कक्षाचेही लोकार्पण करण्यात येणार आहे. तसेच नॅशनल पॉवर ग्रीड कार्पोरेशनतर्फे जिल्हा रुग्णालयाला नवीन वातानुकूलित रुग्णवाहिका देण्यात आली असून याचेही लोकार्पण याच कार्यक्रमाअंतर्गत करण्यात येणार आहे. असे बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा