गुरुवार, ८ डिसेंबर, २०१६

क्रीडा सप्ताहानिमित्त 12 ते 18 डिसेंबर कालावधीत विविध खेळांचे आयोजन


         
          बीड, दि. 8 :- राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा, युवक-युवतीमध्ये क्रीडा विषयक जाणीव निर्माण व्हावी म्हणून दरवर्षी 12 ते 18 डिसेंबर या कालावधीत ''क्रीडा सप्ताह'' आयोजित करण्यात येतेा. या अनुषंगाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बीड व राजर्षि छत्रपती शाहु महाराज प्रतिष्ठाण, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा सप्ताहानिमित्त दि.12 ते 18 डिसेंबर 2016 या कालावधीत विविध खेळ व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
            सोमवार दि.12 डिसेंबर रोजी केज येथील साने गुरुजी निवासी माध्यमिक विद्यालय येथे सकाळी 11 वाजता क्रीडा सप्ताहाचे मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाटन व खुल्या गटातील मुले, मुलींकरीता सॉफ्टबॉल स्पर्धा, मंगळवार दि.13 डिसेंबर रोजी बीड येथील जिल्हा परिषद कन्या शाळेत सकाळी 11 वाजता खुल्या गटातील खेळाडूंसाठी बेसबॉल क्रीडा स्पर्धा, बुधवार दि.14 डिसेंबर रोजी बीड येथील जिल्हा क्रीडा संकुलात सायंकाळी 6 वाजता तायक्वाँदो खेळाचे खुल्या गटातील प्रदर्शनिय सामने, गुरुवार दि.15 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता बीड येथील पालवण चौकातील राजर्षि छत्रपती शाहु महाराज प्रतिष्ठाण कार्यालय येथे खुल्या गटातील मुला-मुलींकरीता युवकांचा क्रीडा प्रकारातील सहभाग कमी होण्याची कारण मीमांसा या विषयावर वक्तृत्व स्पर्धा, शुक्रवार दि.16 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता बीड येथील जिल्हा क्रीडा संकुलात 19 वर्षावरील मुला-मुलींकरीता कुराश खेळाचे प्रदर्शन व सामने, शनिवार दि.17 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता जिल्हा क्रीडा संकुल येथे 17 वर्षाखालील व खुल्या गटातील मुला-मुलींकरीता जिम्नॅस्टीक क्रीडा प्रकाराचे प्रात्यक्षिक व सामने, रविवार दि.18 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता जिल्हा क्रीडा संकुलात सप्ताहाचा समारोप होईल याप्रमाणे सप्ताहाअंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

            सप्ताहातील सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी मुख्याध्यापक श्रीमती कविता कराड (मो.9404021705), बेसबॉल स्पर्धेसाठी रेवननाथ शेलार (मो.9075476791), तायक्वाँदो स्पर्धेसाठी अविनाश बारगजे (मो.9689895999), वक्तृत्व स्पर्धेसाठी अशोक तांगडे (मो.9325056892), कुराश स्पर्धेसाठी एस.एल.अंदूरे (मो.9420025350), जिम्नॅस्टीक स्पर्धेकरीता विनायक वझे (मो.9326401029) यांच्याशी संपर्क साधावा. जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, क्रीडा मंडळे, क्रीडा संस्था यांनी उपरोक्त कार्यक्रमाप्रमाणे क्रीडा सप्ताह अंतर्गत विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवावा आणि खेळाडू, विद्यार्थी, विद्यार्थींनी यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाशी किंवा तत्वशिल कांबळे (मो.9423470437) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच इतर तालुक्यातील शैक्षणिक संस्थांनी कार्यक्रम आयोजित करुन अहवाल क्रीडा कार्यालयास सादर करावा. असे बीडचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा